शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

भोरमधील बारा गावे होणार जलयुक्त

By admin | Updated: March 21, 2016 00:34 IST

जलयुक्त शिवार योजनेंतर्गत भोर तालुक्यातील १२ गावांची निवड करण्यात आली आहे. गावातील विविध प्रकारची कामे करून गावातील टंचाई कायमस्वरूपी दूर करण्यासाठी सुमारे

भोर: जलयुक्त शिवार योजनेंतर्गत भोर तालुक्यातील १२ गावांची निवड करण्यात आली आहे. गावातील विविध प्रकारची कामे करून गावातील टंचाई कायमस्वरूपी दूर करण्यासाठी सुमारे १५ कोटी ४६ लाख रु. निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती उपविभागीय अधिकारी तथा जलयुक्त शिवार अभियान योजनेच्या अध्यक्ष मौसमी बर्डे यांनी सांगितले. पावसाचे पडणाऱ्या, पाणीच्या पाण्याचा एकही थेंब वाया जाऊ नये. पाणी जमिनीत मुरावे आणी टंचाई दूर व्हावी म्हणून शासनाने टंचाईग्रस्त गावे, ५० पैशांपेक्षा कमी आणेवारी असणारी गावे,एकात्मिक पाणलोट क्षेत्र विकास योजनेत असणारी गावे, लोकसहभाग देणारी गावे व आमदार-खासदार यांनी आदर्श गाव म्हणून निवडलेली भोर तालुक्यातील गावांचा समावेश जलयुक्त शिवार अभियानात करण्यात आला आहे. गावांसाठी नेडल अधिकारी नेमण्यात आला आहे. सन २०१६/१७ या वर्षासाठी १२ गावांची निवड जलयुक्त शिवार अभियानांतर्गत करण्यात आली आहे. मागील वर्षी १२ गावे घेण्यात आली होती. गावात कृषी, वन, छोटेपाटबंधारे, ग्र्रामीण पाणीपुरवठा व जलसंधारण विभागांतर्गत तर गाळ काढणे, नालाखोलीकरण, सरळीकरण, दुरुस्ती ही कामे लोकसहभागातून व सामाजिक संस्था किंवा कंपन्यांकडून विविध प्रकारची कामे करून पाणीटंचाई दूर करण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहेत. त्यासाठी सुमारे १५ कोटी ४६ लाख रु. निधीचा अंदाजपत्रक तयार करण्यात आल्याचे कृषी अधिकारी व जलयुक्त अभियानाचे सचिव सूर्यकांत वडखेलकर यांनी सांगितले.भोर तालुक्याच्या पश्चिम भागात दर वर्षी उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणावर पाणीटंचाई निर्माण होते. त्यामुळे या भागातील अधिकाधिक गावांची निवड जलयुक्त शिवार योजनेत करून निर्माण होणाऱ्या भीषण पाणीटंचाईवर मात करता येऊन या भागातील अनेक गावांतील टंचाई दूर करावी, अशी मागणी या भागातील शेतकरी करीत आहेत.जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून टंचाईग्रस्त गावात पावसाचे पडलेले पाणी गावातच जिरवून, मुरवून, नाला खोलीकरण, सरळीकरण, समतल चर, शेततळी, ओढे, कोल्हापूर पद्धतीचे नवीन बांधणे, जुने बंधारे दुरुस्ती करणे, विहिरीतील गाळ काढणे, नळ पाणीपुरवठा योजना दुरुस्त करणे ही कामे करून पाणीटंचाईवर कायमस्वरूपी मात करता येऊ शकते. त्यासाठी भोरच्या उपविभागीय अधिकारी मौसमी बर्डे, खासगी उद्योजक, कंपनीवाले व गावागावांत सर्व विभागाचे प्रमुख व लोकांच्या बैठका घेऊन प्रत्यक्ष स्थळपाहणी करून गावातील टंचाईचा आढावा घेऊन आराखडा तयार करून विविध विभागांना पाठवून त्याचे अंदाजपत्रक तयार करून त्यांना मंजुरी घेण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. (वार्ताहर)