येथील प्राथमिक आरोग्य केंद्र नवीन वर्षात कात टाकत असून, दवाखान्याची सुसज्ज इमारत, प्रयोगशाळा, निवासस्थान आदी सुखसोयींनी युक्त होत असून, रुग्ण तपासणीसाठी आता दोन वैद्यकीय अधिकारी असल्याने, सर्वसामान्यांचा कल सरकारी दवाखान्याकडे वाढत आहे. दवाखान्याच्या सुरक्षेसाठी येथील कर्मचाऱ्यांनीही स्वखर्चाने मोबाइलवरून चालणारे वीस सीसीटीव्ही बसविले आहेत. यासाठी एका टीव्ही संचाची गरज होती. यावेळी बांगरवाडी विकास पतसंस्था व नामदेव पायरी मित्रमंडळ यांनी गरज ओळखून सामाजिक बांधिलकी जपत ३२ इंची एक एलईडी टीव्ही संच आरोग्य केंद्राला भेट देऊन सुरक्षाविषयक कामाला हातभार लावला.
यावेळी वैद्यकीय अधिकारी डाॅ.संदीप थोरात, डाॅ.अभिषेक मावळे, शिवसेना उपतालुका प्रमुख मोहन बांगर, पतसंस्था व्यवस्थापक प्रमोद बांगर, नाथा सावंत, दौलत बांगर, वसंतराव कदम, तसेच सर्व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.
१३बेल्हा
प्राथमिक आरोग्य केंद्राला टीव्ही संच भेट देताना बांगरवाडी विकास पतसंस्था व नामदेव पायरी मित्रमंडळाचे कार्यकर्ते.