शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
2
मतदार यादीतून वगळलेले ६५ लाख कोण? तीन दिवसांत सादर करा; सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला आदेश
3
१ पद, २ विभाग अन् २ आदेश; CM देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या खात्यांमध्ये नियुक्तीवरून संघर्ष?
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेले मुख्यालय पुन्हा बांधण्यासाठी जैशचा प्रमुख पुन्हा सक्रिय; मसूद अझहरने अनेकांकडे देणग्या मागितल्या
5
नवजात लेकीला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकलं पण 'त्याने' जीवदान दिलं, शरीराला लागलेले किडे
6
RBI च्या निर्णयानंतर गुंतवणूकदारांना झटका! विप्रोसह 'या' क्षेत्रात मोठी घसरण, कुठे झाली वाढ?
7
“जनभावनेचा आदर करणारे हे सरकार, आम्ही...”; ‘महादेवी’ परतण्याबाबत एकनाथ शिंदेचे मोठे विधान
8
लग्नाचं निमंत्रण दिलं नाही, सहकाऱ्यांनी एचआरकडे केली तरुणीची तक्रार, त्यानंतर घडलं असं काही...
9
"कित्येकांनी बलिदान दिले, शिरांचे ढीग लागले, पण धर्म सोडला नाही"- मोहन भागवत
10
एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी; अमित शाहांशी बैठकीत काय चर्चा झाली? खुद्द उपमुख्यमंत्री म्हणाले...
11
"डोकं फिरवू नका, मी मंत्री, तुम्ही मलाच न सांगता...", PWD अधिकाऱ्यावर संतापले दयाशंकर सिंह
12
जगाला आपल्या धाकात ठेऊ पाहणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची संपत्ती किती? उत्पन्नाचा खरा स्रोत कोणता?
13
एकावर एक बोनस शेअर देणार 'ही' कंपनी; सोबत डिविडंडही मिळणार; गुंतवणुकदारांना दुप्पट फायदा
14
आधार ओटीपी वापरून ITRचं ई-व्हेरिफिकेशन करा, अन्यथा रिटर्न अवैध ठरेल; पाहा संपूर्ण प्रोसेस
15
८८२ कोटींचा खर्च, २०२८ मध्ये होणार पूर्ण; ८ ऑगस्टला सीतामातेच्या जानकी मंदिराचे भूमिपूजन
16
'कायद्याच्या कचाट्यात महादेवी हत्तीला अडकवू नका, ... तोपर्यंत लढा सुरूच राहणार'; राजू शेट्टींनी स्पष्टच सांगितलं
17
वॉशिंग मशिन वापरताना ‘ही’ किरकोळ चूक जीवावर बेतली; तरुणाचा मृत्यू; करायला गेला एक आणि..
18
बुकिंग करणाऱ्या ग्राहकांवरच शाओमी उलटली; आता म्हणतेय आठवड्यात पूर्ण पैसे द्या नाहीतर...
19
Wasim Jaffer: वसीम जाफरवर मोठी जबाबदारी, आता विदर्भातील खेळाडूंना शिकवतील फलंदाजीचे धडे!
20
ICC Test Ranking : मियाँ 'मॅजिक'नंतर 'मार मुसंडी' शो! सिराजला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट

१० लाखांची उलाढाल ठप्प

By admin | Updated: June 2, 2017 01:55 IST

तालुक्यात काही भागातील अपवाद वगळता आज शेतकरी संपाचा चांगलाच परिणाम जाणवला. अनेक गावांत शेतकऱ्यांनी

लोकमत न्यूज नेटवर्कशिरूर : तालुक्यात काही भागातील अपवाद वगळता आज शेतकरी संपाचा चांगलाच परिणाम जाणवला. अनेक गावांत शेतकऱ्यांनी दूध रस्त्यावर ओतले, भाजीपाला, तरकारी, भुसार मालाची आवक रोडावली. अनेक गावांत शेतकऱ्यांनी आवाहन केल्याने कडकडीत बंद पाळण्यात आला. शिरूर शहरात भाजीपाला, तरकारी, भुसार मालाची जवळपास दहा लाखांची उलाढाल ठप्प झाली. शेतकरी आंदोलकांनी दुधाची गाडी फोडली.आजपासून शेतकऱ्यांनी संप पुकारल्याने त्याचा संपूर्ण तालुक्यात परिणाम जाणवला. पूर्व भागातील मांडवगण-फराटा, वडगाव रासाई, शिरसगाव-काटा, कुसली, इनामगाव आदी गावांत कडकडीत बंद पाळण्यात आला. अनेक शेतकऱ्यांनी आज सकाळी डेअरीवर दूध आणलेच नाही. ज्यांनी आणले त्यापैकी बहुतांशी शेतकऱ्यांनी दूध रस्त्यावर ओतून दिले. या भागातून मोठ्या प्रमाणावर भाजीपाला, तरकारीची आवक होते. आज मात्र ही जावक ठप्प झाली. शेतकऱ्यांनी भाजीपाला, तरकारी घरीच ठेवणे पसंत केले. निर्वी येथे दर गुरुवारी आठवडे बाजार भरतो. आज हा बाजार बंद ठेवण्यात आला. बेट भागात कवठे-येमाई, टाकळी हाजी, जांबूत, पिंपरखेड या गावांत बंद पाळण्यात आला. शेतकऱ्यांनी सकाळी रस्त्यावर दूध ओतले. तरकारी, भाजीवाला भुसार मालाची आवक जावक ठप्प झाली. तळेगाव ढमढरे येथील उपबाजारातील भुसार मालाची आवक ठप्प झाली. एकही डाग आवक झाली नाही. व्यापाऱ्यांकडे असणारा माल घेण्यासाठी खरेदीदार न आल्याने ७० टक्के जावक ठप्प झाली. सध्या दररोज २० ते २५ गाडी भाजीपाला, तरकारी पुण्याला जावक होते. आजही जावक ठप्प झाली. पाबळ येथे शेतकऱ्यांनी रस्त्यावर दूध ओतून संपाला पाठिंबा दिला. निमोणे, चिंचणी, शिंदोडी येथे संपाचा फारसा परिणाम झाला नाही. दूध संकलन नेहमीप्रमाणे झाले. कोरेगाव भीमाचा आठवडे बाजारावर काही फरक पडला नाही. नेहमीप्रमाणे बाजार भरला. शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी व्यापाऱ्यांना गुलाबपुष्प देऊन संपात सहभागी होण्याचे आवाहन केले. शेतकऱ्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र आणलेला माल काय फेकून द्यायचा का, असा सवाल करून मालाची बाजारात विक्री केली. अण्णापूर येथे अनंतबाबा प्रतिष्ठानच्यावतीने रास्ता रोको करण्यात आला. यावेळी विक्रीसाठी दूध घेऊन जाणाऱ्यांना अडवून काही दूध रस्त्यावर ओतण्यात आले. तर, काही दूध गरिबांना वाटप करण्यात आले. शिरूर बाजार समिती येथे दररोज ७० ते ८० भाजीपाला तरकारीच्या गाड्या येतात. यात दररोज लाखो रुपयांची उलाढाल होते. आज पहाटेच शेतकरी कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी येऊन पाहणी केली. मात्र, शेतकऱ्यांच्या प्रतिसादामुळे आज गाड्या आल्याच नाहीत. ज्या आल्या त्यांना समितीच्या कार्यकर्त्यांनी परत पाठवले. शेतकऱ्यांनी बाजार समितीसमोर रस्त्यावर दूध ओतले. या दरम्यान नाव असलेल्या अमोल डेअरीची गाडी कार्यकर्त्यांनी फोडली. शहरात दररोज भरणारा बाजारही बंद ठेवण्यात आला. आडती होणारी लाखो रुपयांची आवकही आजच्या संपामुळे ठप्प झाली.