शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

दूध व्यवसाय अडचणीत

By admin | Updated: November 3, 2014 05:09 IST

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दूध पावडरचे दर घसरले आहेत. तर, यूपीए सरकारने दिलेले ६ टक्के अनुदान सध्या नवीन सरकारने बंद केले आहे

लोणी देवकर : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दूध पावडरचे दर घसरले आहेत. तर, यूपीए सरकारने दिलेले ६ टक्के अनुदान सध्या नवीन सरकारने बंद केले आहे. परिणामी, दूध पावडर तयार करणाऱ्या कंपन्यांनी दूध खरेदी थांबवली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात अतिरिक्त दुधाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे दूध व्यवसाय अडचणीत आला आहे, अशी माहिती सोनाई उद्योग समूहाचे अध्यक्ष दशरथ माने यांनी दिली.‘फोन्टेरा’ ही जागतिक बाजारपेठेमध्ये सर्वांत जास्त दूध भुकटी विकणारी कंपनी आहे. त्याचा सध्याचा दर २२०० डॉलर प्रतिटन इतका आहे. त्याचे रुपयात मूल्यांकन केल्यास दूध भुकटीचा प्रतिकिलो दर रु. १४० ते १४५, तर दुधास १४ ते १५ रुपये प्रतिलिटर इतका होतो. त्यामुळे आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय बाजारपेठेत दराच्या प्रचंड घसरणीचा फटका या व्यवसायाला पर्यायाने शेतकरीवर्गास बसत आहे. सध्या दूध उत्पादकास २६ रुपये प्रतिलिटरवरून २० रुपये प्रतिलिटर ३.५ / ३.८ गुणवत्तेच्या दुधास भाव मिळत आहे. त्यामुळे गाईच्या किमतीतील गुंतवणूक वाढलेले पशुखाद्य चाऱ्याची किंमत व अन्य व्यवस्थापन खर्च याचा ताळमेळ बसत नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. याउलट केंद्र सरकारने मांस निर्यातीसाठी भरघोस अनुदान दिल्याने कत्तलखान्याचा धंदा तेजीत चालत आहे. या स्थितीचा फायदा घेऊन अनेक दुभती जनावरे कवडीमोलाने विकली जात असल्याचा आरोप माने यांनी केला आहे.यूपीए सरकाने दूध पावडरवरील निर्यातबंदी उठवून सोबत कृषी उपजीविका योजनेअंतर्गत व ‘ड्यूटी ड्रॉबॅक’ योजनेअंतर्गत यावर ६ टक्के अनुदान दिले. त्यामुळे पुढील काळात २ लाख टनापेक्षा अधिक दूध पावडर निर्यात झाली. दूध उत्पादकांना ३.५ /५.५ गुणवत्तेच्या दुधास दर १८ रुपयांवरून २६ रुपयांपर्यंत भाव मिळाला. त्यामुळे हा व्यवसाय अधिक मोठ्या प्रमाणात वाढला. (वार्ताहर)