शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूरला पाणी बंद करा

By admin | Updated: May 13, 2017 04:27 IST

सोलापूर शहरासाठी पिण्याच्या पाण्याच्या नावाखाली भीमा नदीतून दरवर्षी सोडण्यात येणारे उजनी धरणातील २२ टीएमसी

लोकमत न्यूज नेटवर्कइंदापूर : सोलापूर शहरासाठी पिण्याच्या पाण्याच्या नावाखाली भीमा नदीतून दरवर्षी सोडण्यात येणारे उजनी धरणातील २२ टीएमसी पाणी बंद करण्यात यावे, या मागणीसाठी इंदापूर तालुक्यातील धरणग्रस्तांनी महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाकडे याचिका दाखल केली आहे. मुंबई उच्च न्यायालयात ते याचिका दाखल करणार आहेत.पळसदेवचे धरणग्रस्त प्रवीण काळे, अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील खेड गावचे निवृत्त वनपरिक्षेत्र अधिकारी डी. बी. कापसे यांनी माहिती दिली. ते म्हणाले की, उजनीच्या मूळ आराखड्यात भीमा नदीत पाणी सोडता येणार नाही असा स्पष्ट उल्लेख आहे. तथापि नियम कायदा धाब्यावर बसवून केवळ पुढाऱ्यांच्या दबावामुळे अधिकारी पाणी सोडत आहेत. सोलापूर शहराला पिण्यासाठी जे पाणी लागत आहे. ते जलवाहिनी टाकून घेऊन जावे, असे लेखी आदेश महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण दरवर्षी सोलापूर महानगरपालिकेला लेखी आदेश देत आहे. मात्र तशी कार्यवाही महानगरपालिका करत नाही.वास्तविक पाहता सोलापूर शहराला वर्षाला साधारण दोन टीएमसी पाण्याची गरज आहे. त्यापैकी एक टीएमसी पाणी सध्या रोज नळपाणी पुरवठा योजनेमधून जाते. केवळ एक टीएमसी पाण्यासाठी जानेवारी ते जून या सहा महिन्यात तब्बल २२ टीएमसी पाणी दरवर्षी भीमा नदीत सोडले जाते. ते बंद करण्यात यावे, असे सांगून त्या ऐवजी नळपाणी पुरवठा योजना तयार करुन, सोलापूरला जेवढे पाणी लागते तेवढे घेऊन जावे, त्यास आमची हरकत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.