शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
5
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
6
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
7
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
8
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
9
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
10
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
11
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
12
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
13
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
14
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
15
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
16
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
17
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
18
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
19
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या

तुकाराम गाथा जीवनास तारक

By admin | Updated: December 22, 2015 23:52 IST

ज्या ईश्वरी सत्तेने सकलांना आकलन शक्ती दिली, त्या ईश्वरी सत्तेचे स्वरूप अनाकलनीय आहे. संत तुकोबांची गाथा ही जीवनाला तारणारी आहे,

पिंपरी : ज्या ईश्वरी सत्तेने सकलांना आकलन शक्ती दिली, त्या ईश्वरी सत्तेचे स्वरूप अनाकलनीय आहे. संत तुकोबांची गाथा ही जीवनाला तारणारी आहे, असे प्रतिपादन हभप प्रमोदमहाराज जगताप यांनी येथे केले. चिंचवड देवस्थान ट्रस्ट, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका व ग्रामस्थ आयोजित महासाधू श्री मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवात ‘तुकाराम गाथा’ या विषयावर प्रवचन देताना प्रमोदमहाराज जगताप बोलत होते. ‘कुमुदिनी काय जाणे तो हा परिमल’ या अभंगावर जगताप यांनी निरुपण केले. ते म्हणाले, ‘‘संत तुकाराम महाराजांनी या अभंगातून परमेश्वराशी संवाद साधला आहे. विज्ञान प्रगत झाले. माणसाने मंगळावर स्वारी केली, तरी ईश्वरी सत्ता अनाकलनीय ठरली. देव कळणे कठीण गोष्ट आहे. मात्र ईश्वरी सत्तेलाही एक गोष्ट अनाकलनीय आहे. देवाला त्याचे नाव किती श्रेष्ठ आहे हेही अनाकलनीय आहे असे तुकाराम म्हणतात.’’ महोत्सवांतर्गत सकाळी गाथापारायण, दुपारी भजन आदी कार्यक्रम झाले.गंगानगरात नाम यज्ञास सुरुवातअखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेना व आध्यात्मिक केंद्राच्या वतीने दत्त जयंतीनिमित्त गंगानगर, आकुर्डी येथील केंद्रामध्ये अखंड नाम, जप यज्ञ सप्ताहास धार्मिक वातावरणात सुरुवात झाली. धार्मिक कार्यक्रमांसहित प्रबोधनात्मक व्याख्यान, विविध याग व सामुदायिक गुरुचरित्र, स्वामीचरित्र पारायणास प्रतिसाद मिळाला.केंद्रामध्ये सप्ताहाची सुरुवात मंडलपूजा व सामुदायिक गुरुचरित्र, स्वामीचरित्र पारायणाने करण्यात आली. या वेळी गणेश याग, मनोबोध याग, श्री गीताई याग तसेच महिलांच्या प्रतिसादात श्री चंडीयाग पार पडला. सप्ताहामध्ये वैद्यकीय विभागातर्फे झालेल्या विनामूल्य रोगनिदान व उपचार शिबिरास चांगला प्रतिसाद मिळाला.प्रबोधनात्मक कार्यक्रमात ‘बालकांची भाषा समजून घेताना,’ ‘मानवी जीवनामुळे होणारा पर्यावरणाचा ऱ्हास,’ ‘लग्नाला सामोरे जाताना,’ ‘वास्तुशास्त्र समजून घेताना’ या विषयावर तज्ज्ञांनी सेवेकऱ्यांना मार्गदर्शन केले. या वेळी विविध विषयांवर तज्ज्ञांना सेवेकऱ्यांनी प्रश्न विचारून शंका निरसन करून घेतले.श्री स्वामी चरित्र सारामृत सामुदायिक ग्रंथवाचन २४ डिसेंबरला होणार आहे. रुद्र लिंगार्चन पूजन आदी धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.केंद्रामध्ये समर्थांची मूर्ती व प्रतिमेस आकर्षक व सजावट करण्यात आली आहे. २५ डिसेंबरला दत्त जयंतीनिमित्त महाआरती होणार आहे. सप्ताहाची सांगता २६ डिसेंबरला श्री सत्यदत्त पूजन व आरतीने होणार आहे. (प्रतिनिधी)