शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

प्रेयसीला विष पाजून जिवे मारण्याचा प्रयत्न

By admin | Updated: June 29, 2017 03:34 IST

लग्नाला नकार दिल्याने प्रियकराने प्रेयसीला विष पाजून जिवे मारण्याचा प्रयत्न केला व विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.

लोकमत न्यूज नेटवर्कनारायणगाव : लग्नाला नकार दिल्याने प्रियकराने प्रेयसीला विष पाजून जिवे मारण्याचा प्रयत्न केला व विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. नारायणगाव पोलिसांनी प्रियकरावर जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. हे प्रेमी युगुल आंबेगाव तालुक्यातील असून हा प्रकार नारायणगाव येथील गणपीर बाबा डोंगरावर घडला, अशी माहिती नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक टी़ वाय़ मुजावर यांनी दिली़स्वप्निल शंकर इंदोरे (रा़ चांडोली, ता़ आंबेगाव) या तरुणावर दि़ २७ रोजी मुलीच्या फिर्यादीवरून नारायणगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत मुजावर यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वप्निल व रांजणी येथील प्रेयसी यांच्यात एक वर्षापासून प्रेमसंबंध होते़ मुलगी ही नारायणगाव येथे द्वितीय वर्षात कॉलेजचे शिक्षण घेते़ मुलीचे लग्न दुसऱ्या व्यक्तीबरोबर जमलेले आहे़ प्रेयसीचे लग्न जमल्याचे समल्यावर स्वप्निलने दि़ १९ जून रोजी १२.३० वा. फोन करून नारायणगाव बस स्थानकावर बोलावले़ बस स्थानकावर गर्दी असल्याने ते कायम भेटत असलेल्या गणपीर बाबा मंदिराच्या ठिकाणी दोघेही गेले़ स्वप्निलने त्याच्या मोबाईलमध्ये असलेले दोघांचे फोटो दाखविले. या वेळी मुलीने ‘माझे लग्न जमलेले आहे़ माझा विषय सोडून दे,’ असे सांगूनही स्वप्निलने, ‘तुझ्याच बरोबर लग्न करणार आहे. तुझे दुसऱ्याबरोबर लग्न होऊ देणार नाही,’ असे सांगून खिशातून विषाची बाटली काढून तिच्या डोक्यात मारली व तिच्या तोंडात ती ओतली़ ती चक्कर येऊन पडल्यानंतर स्वप्निलनेदेखील विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला़ नारायणगाव येथील एका खासगी रुग्णालयात मुलीला उपचांरासाठी दाखल केले असून तिची प्रकृती स्थिर आहे़ तिने दिलेल्या फिर्यादीवरून स्वप्निल इंदोरे याच्यावर प्रेयसीला जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.