शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

स्मारकासाठी प्रयत्न करणार

By admin | Updated: March 27, 2017 02:39 IST

ज्या ज्या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे वास्तव्य झाले व त्यांनी भेटी दिल्या, त्या ठिकाणांचा विकास करण्यासाठी

लोणावळा : ज्या ज्या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे वास्तव्य झाले व त्यांनी भेटी दिल्या, त्या ठिकाणांचा विकास करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तसेच राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात बाबासाहेबांना अभिप्रेत संकल्पना प्रत्यक्षात आणू, असे मत सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी व्यक्त केले. आॅल इंडिया भिक्खू संघ यांच्या वतीने लोणावळ्यात आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय बौद्धधम्म महाअधिवेशनात बडोले यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. व्यासपीठावर केंद्रीय न्यायमंत्री रामदास आठवले, आमदार बाळा भेगडे, भदंत महाबोधी डॉ. राहुल बोधी महाथेरो, भदंत पघ्यादीपजी, भदंत विरत्न थेरो, भदंत विनय बोधी थेरो, रिपाइंचे प्रदेश महामंत्री अविनाश महातेकर, पुणे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, नगराध्यक्षा सुरेखा जाधव, चित्रा जगनाडे, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, सुनील शेळके, नगरसेवक दिलीप दामोदरे, अनिता पवार, पंचायत समिती सभापती गुलाब म्हाळसकर, रिपाइंचे नेते गणेश गायकवाड, संजय आडसुळे, लक्ष्मण भालेराव, चंद्रकांता सोनकांबळे, शांताराम कदम आदी उपस्थित होते.शांती, समता व बंधुत्वाचा संदेश देणाऱ्या बौद्ध धर्माचा भिक्खू संघाने जगभरात प्रचार व प्रसार करावा,असे मत केंद्रीय सामाजिक व न्यायमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले. आमदार भेगडे म्हणाले, ‘‘मावळ तालुक्यातील देहूरोड येथील दीक्षाभूमी व तळेगाव येथील डॉ. आंबेडकर यांच्या निवासस्थानाच्या विकासासाठी कालच राज्य शासनाने दीड कोटींचा निधी मंजूर केला आहे, आॅल इंडिया भिक्खू संघाचे मुख्यालय असलेल्या गया येथे २५ कोटी रुपयांचे अद्ययावत बुद्धविहार उभारण्यासाठी शासनाच्या माध्यमातून मदत करण्याचे आश्वासन आठवले यांनी दिले. महाअधिवेशनाचे आयोजक भदंत डॉ. राहुल बोधी यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. २२ देशांतील धर्मगुरू व प्रतिनिधी सहभागी झाले होते. (वार्ताहर)रामदास आठवले : संविधानामुळे जाती-धर्म एकत्रआठवले म्हणाले, ‘‘मला बौद्ध धर्माचा अभिमान आहे. मात्र, मी सर्व जाती-धर्माचा आदर करतो. कोणी कोणता धर्म स्वीकारायचा, कोणाचे पालन करायचे यांचे प्रत्येकांना स्वातंत्र्य आहे. भारत हा हिंदू देश असला, तरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने या देशात सर्व जाती-धर्माचे लोक एकत्र नांदत आहेत. सम्राट अशोक हे क्षत्रिय होते. मात्र, त्यांनी शांतीचा संदेश देणाऱ्या बौद्ध धर्माची दीक्षा घेतली व प्रचार केला. डॉ. आंबेडकर यांनी बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर जगभरात मोठ्या प्रमाणात बौद्ध धर्माचा प्रसार झाला.