गराडे : दिवे (ता.पुरंदर) येथे लोकसहभागातून बंधाऱ्यातील गाळ काढण्याचे काम सुरू आहे. या बंधाऱ्यातील आणखी गाळ काढण्याच्या कामाला मदत मिळावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. त्यानंतर ‘जलयुक्त शिवार अभियाना’तून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन कृषी आयुक्त विकास देशमुख यांनी दिले.विकास देशमुख यांनी शंकर काळे व आदी शेतकऱ्यांनी ‘गट शेती संकल्पने’नुसार उभारलेल्या हरित गृहास भेट दिली. या भेटीत हरित गृहातील कॉर्नेशियन लागवडीची पाहणी केली. सदर शेतकऱ्यांनी ‘रोहयो’अंतर्गत लागवड केलेली चिकूची फळबाग व ‘राष्ट्रीय कृषी विकास योजने’अंतर्गत सामूहिक शेततळ्याची माहिती आयुक्तांना दिली.गुलाबराव जगदाळे यांच्या ‘राष्ट्रीय कृषी विकास योजने’अंतर्गत पूर्ण करण्यात आलेल्या सामूहिक शेततळ्यास आयुक्तांनी भेट दिली. सामूहिक शेततळ्यातील पाणी वापराने भाजीपाला घेऊन आर्थिक फायदा होत असल्याचे जगदाळे यांनी आयुक्तांना सांगितले. श्रीरंग झंडे यांच्या ‘राष्ट्रीय फलोत्पादन अभियाना’अंतर्गत २००९-१० मध्ये उभारण्यात आलेल्या २६ गुंठे ‘शेडनेट हाऊस’मधील ढोबळी मिरची; तसेच ८० टन क्षमतेची कांदाचाळ याचीही पाहणी करण्यात आली. (वार्ताहर)पृथ्वीराज ढुमे यांच्या सीताफळ प्रकल्पास भेट दिल्यानंतर, एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत सिमेंट नालाबांधाची पाहणी केली. सदर बंधाऱ्यामुळे आसपासच्या ५०० मीटर परिसरातील १० ते १२ विहिरी व बोअरवल पाणी पातळीमध्ये वाढ झाल्याचे पाणलोट समितीचे अध्यक्ष राजाराम झेंडे यांनी सांगितले.
बंधाऱ्यासाठी प्रयत्न करणार
By admin | Updated: January 22, 2015 23:21 IST