शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

बिनचूक आरोपपत्राने शिक्षेचे प्रमाण वाढेल : अ‍ॅड. उज्ज्वल निकम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 05:19 IST

महिला अत्याचारावरील कायदा कठोर असणे आवश्यकच आहे. मात्र कायद्याची आणि शिक्षेची अंमलबजावणी त्वरित होणे गरजेचे आहे. याकरिता तक्रार व आरोपपत्र बिनचूक दाखल केल्यास शिक्षा देणे सोपे होईल व शिक्षा देण्याचे प्रमाण वाढेल.

पुणे : महिला अत्याचारावरील कायदा कठोर असणे आवश्यकच आहे. मात्र कायद्याची आणि शिक्षेची अंमलबजावणी त्वरित होणे गरजेचे आहे. याकरिता तक्रार व आरोपपत्र बिनचूक दाखल केल्यास शिक्षा देणे सोपे होईल व शिक्षा देण्याचे प्रमाण वाढेल. त्यातूनच समाजाला एक भक्कम संदेश जातो. तसेच शिक्षा देताना होत असलेला अक्षम्य विलंब टाळला जावा, असे मत विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केले.महाराष्ट्र राज्य महिला आयोग व स्त्री आधार केंद्राच्या वतीनेमहिला कायदेविषयक कार्यशाळेमध्ये ते मार्गदर्शन करत होते. यावेळी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव डॉ. मंजुषा मोळवणे, स्त्री आधार केंद्राच्या अध्यक्षा आमदार डॉ. नीलम गोºहे, अ‍ॅड. उज्ज्वला पवार उपस्थित होते.रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले, आज संपूर्ण यंत्रणेचा उद्देशच हरविल्यासारखा वाटतो. १८६०चे कायदे अजूनही अमलात आहेत हे दुर्दैवी आहे़ तपास यंत्रणा सक्षम करावी़ विधिमंडळातून या सर्व मुद्द्यांना न्याय व पाठपुरावा आम्ही करू़डॉ. गोºहे म्हणाल्या, या कायद्यात जरी सुधारणा झाली आहे तरी ते पूर्ण निर्दोष झालेले नाहीत. जेव्हा एका पीडितेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातो, तेव्हा महिला कार्यकर्त्यांनी आपले मनोबल स्थिर ठेवावे. बाललैंगिक अत्याचारांच्या प्रकरणामध्ये बालकांचे वय विचारात घेऊन न्यायालयाची सामाजिक रचना असावी़ तसेच शासकीय कर्मचाºयांवर जेव्हा लैंगिक अत्याचार होतो तेव्हा त्या पीडित महिलेला रजा अथवा तत्सम सुविधांचा आजपर्यंत विचार केला नसून याबाबत राज्य महिला आयोगाने राष्ट्रीय महिला आयोगाशी विचारविनिमय करून याबाबत नियम करावेत़महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव डॉ. मंजुषा मोळवणे यांनी आयोगाच्या कामकाजाबाबत व आतापर्यंतच्या वाटचालीबाबत व स्त्री अधिकार केंद्राच्या वतीने करण्यात येणाºया संशोधन प्रकल्पाबाबत माहिती दिली.या कार्यशाळेत सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई, महिला आयोगाच्या माजी सदस्य आशा मिरगे, रघुनाथ कुचिक, अ‍ॅड. वैशाली चांदणे, आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. अनिरुद्ध देशपांडे, डॉ. मीनाक्षी भोसले, मंगल खिंवसरा, झेलम जोशी, शुभा शमीम, अ‍ॅड़ गणेश कवडे, अनुराधा सहस्रबुद्धे, सुनीता मोरे, रूपा शहा, वर्षा देशपांडे, मंगल चव्हाण, गौतम गालफाडे, नंदकुमार ढेकणे आदींनी भाग घेतला.महिला संघटनांनी महिला अत्याचारांच्या बाबतीत अगदी सर्वोच्च न्यायालयापर्यंत निकालाचा मागोवा घ्यावा, ज्यामुळे पीडितेला खरा न्याय मिळेल़ पीडितेचे तीन-तीन विविध ठिकाणी जबाब घेतले जातात. प्रसंगी मानसिक दडपणाला सामोरे जावे लागत असल्याने पीडितेच्या यातील कुठल्याही एक जबाबात काही तफावत आढळली तर त्यातून आरोपीच्या वकिलांना पळवाट काढण्याची संधी मिळते. तसेच विविध यंत्रणेपुढे जबाब द्यावा लागत अल्यामुळे पीडितेचा मानसिक कोंडमारा होतो. शारीरिक अत्याचाराच्या घटनेत सरकारी वकिलाचे पोलिसांना मार्गदर्शन असणे अत्यंत गरजेचे आहे़- अ‍ॅड़ उज्ज्वल निकम,विशेष सरकारी वकील

टॅग्स :Ujjwal Nikamउज्ज्वल निकमPuneपुणे