शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
2
"हिंदी भाषा काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत बोलली गेलीच पाहिजे, केंद्राने..."; अबू आझमींकडून हिंदीची वकिली
3
पहलगामच्या हल्ल्यात ३ नव्हे ४ दहशतवादी होते सामील; चौथा काय करत होता? ऐकून येईल चीड!
4
आठ महिन्यांत चौघांची हत्या; २० वर्षांच्या गँगस्टरचा एन्काऊंटरमध्ये खात्मा, VIDEO आला समोर
5
"कुठे आहेत नाना पाटेकर, प्रशांत दामले? कुठायत मराठी क्रिकेटपटू?"; हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून सवाल
6
खासदार प्रिया सरोज आणि क्रिकेटर रिंकू सिंह यांच्या लग्नाची तारीख टळली; समोर आलं मोठं कारण...
7
धारावीतील २४९ पैकी १६१ बांधकामे पात्र, पहिली यादी जाहीर; अपात्र लोकांना ५ जुलैपर्यंत संधी
8
इराणने कमी क्षमतेच्या मिसाईल डागल्या अन् अमेरिकेने त्या पडू दिल्या...; कतारवरील हल्ल्यामागचे गुपित कुणाला कळले...
9
सोहेलसोबत पळून जाऊन केलेलं लग्न, मग २४ वर्षांनी का झाला घटस्फोट? सीमा सजदेहने सांगितलं खरं कारण
10
कसली भारी दिसत्येय 'सैराट'मधील परश्याचा मित्र 'लंगड्या'ची गर्लफ्रेंड, सौंदर्यात नायिकांनाही देते टक्कर!
11
ठाणे: आणखी २ इमारतींवर हातोडा, मुंब्रा-शीळच्या बेकायदा इमारतींमधील रहिवासी रस्त्यावर
12
मध्य पूर्वेतील तणाव, हिंडगनबर्गचे आरोप अन् धारावी प्रकल्प; गौतम अदानी स्पष्टच बोलले
13
युद्धविरामाबाबतचा संभ्रम संपला, अखेर इस्राइल-इराणमधील संघर्ष आटोपला, पण अखेरचा हल्ला करत इराण म्हणाला...  
14
इराण-इस्रायल युद्धबंदीमुळे बाजार 'रॉकेट'; पण 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले; काय आहे कारण?
15
कोण आहे अलीफा अहमद?; पती डॉक्टर तर स्वत: TCS मध्ये करत होती नोकरी; आता बनल्या आमदार
16
Iran Israel War : इराण-इस्त्रायलमध्ये १२ दिवसांचं युद्ध, लष्करी तळ, शहरं उद्ध्वस्त; कुणाचं किती नुकसान?
17
UPI युजर्ससाठी मोठी बातमी! ट्रान्झॅक्शन फेल झालं तर लगेच मिळणार रिफंड; 'या' तारखेपासून लागू होणार नियम
18
पंतचा पराक्रम, एकाच कसोटीत दोन शतकं ठोकताना केले १० विक्रम, अशी आहे संपूर्ण यादी
19
पावसाने पाठ फिरवल्याने विदर्भासह मराठवाड्यात अत्यंत भीषण अवस्था !
20
भंगाराखाली दडलंय काय?; ट्रक रोखला, तपासणी केली तेव्हा आढळला १ कोटींचा 'गुलाबी खजिना'

नगर-कल्याण महामार्गावर ट्रकचा अपघात

By admin | Updated: April 10, 2017 01:43 IST

गावच्या हद्दीत नगर-कल्याण महामार्गावर ट्रकच्या धडकेने एक जखमी झाला तर, पुढे काही अंतरावर

ओतूर : गावच्या हद्दीत नगर-कल्याण महामार्गावर ट्रकच्या धडकेने एक जखमी झाला तर, पुढे काही अंतरावर ट्रक रस्त्याच्या बाजूच्या गाळ्यामध्ये घुसल्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. हा अपघात गुरुवारी रात्री १०.३० च्या दरम्यान ओतूरच्या मोनिका चौक ते नवीन बसस्थानकादरम्यान झाला.याबाबत पोलीस सूत्रांकडुन मिळालेली माहिती अशी : गुरुवारी झालेल्या या अपघाताबाबत ट्रक चालक अशोक परमेश्वर भाभड (रा. अगस्थान, ता. पाथर्डी, जि. अ.नगर) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत हकिगत अशी की, रात्री कल्याणकडून पाथर्डीकडे चाललेला ट्रक एमएच २० सीटी १९१९ याने हायवेवर ओतूर गावच्या हद्दीत मोनिका चौकात गणेश भास्कर कदम यांना ठोकर देऊन जखमी केले. ट्रकचालकाने ट्रक तशीच पुढे नेऊन बसस्थानकाच्या थोडे मागे कच्चा रस्ता पाहून ट्रक हायवेच्या खाली घेतली. मात्र, ट्रक येथील दोन गाळ्यात घुसला, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, ट्रकचालक येथून निघून त्याच्या घरी पाथर्डीला गेला. ट्रक गाळ्यात घुसल्यामुळे येथील गाळ्यातील संतोष तांबे यांच्या विघ्नहर पशुखाद्य ट्रेडिंग कं. या दुकानातील लाखो रुपयांच्या पशुखाद्याचे व इतर साहित्याचे नुकसान झाले आहे, तर यांच्या शेजारीच असलेल्या अभिजित बयस यांच्या अनुष्का अ‍ॅटो कन्सल्टंट या दुकानात असलेल्या सहा दुचाकी या ट्रकखाली चिरडल्याने दुचाकीचेही नुकसान झाले आहे. महेश कदम यांनी ओतूर पोलिसांत फिर्याद दिली आहे.