शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

तरकारी पिकांना कवडीमोल भाव

By admin | Updated: January 9, 2017 02:16 IST

येथील शेतकऱ्यांच्या भाजीपाला आणि तरकारी पिकांना भाव मिळत नसल्यामुळे कवडीमोल बाजारभावामुळे शेतकरी पूर्ण उद्ध्वस्त झाला आहे.

निरगुडसर : येथील शेतकऱ्यांच्या भाजीपाला आणि तरकारी पिकांना भाव मिळत नसल्यामुळे कवडीमोल बाजारभावामुळे शेतकरी पूर्ण उद्ध्वस्त झाला आहे. ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था पूर्ण कोलमडली आहे़ याचा परिणाम शेतकऱ्यांच्या दैनंदिन व्यवहारावर झाला असून नोटाबंदीच्या निर्णयामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे़आंबेगाव तालुक्यामध्ये असणाऱ्या डिंभे धरण उजवा आणि डावा कालवा, तसेच घोड नदीला असणाऱ्या बारमाही पाण्यामुळे तालुक्यामध्ये सर्वाधिक प्रमाणामध्ये भाजीपाला आणि तरकारी पिके शेतकरी घेत असतात़ कमी कालावधीमध्ये अधिक उत्पादन काढून पैसे मिळवण्याकडे या भागातील शेतकऱ्यांचा कल असतो़ परंतु सध्या मिळणाऱ्या बाजारभावामुळे भाजीपाला आणि तरकारी पिकांचा उत्पादन खर्च तर लांबच. त्यामुळे काढणीअभावी शेतकऱ्यांनी पिके शेतातच सोडून दिली असून काही शेतकऱ्यांनी जनावरे शेतात सोडली आहेत़ काही शेतकऱ्यांनी बाजार समितीत विक्रीसाठी घेऊन गेलेला शेतमाल तेथेच फेकून द्यावा लागला आहे़ गेल्या दोन वर्षांपासून शेतकऱ्यांचे हाल सुरू असून ग्रामीण भागातील शेतकरी उद्ध्वस्त झाला असल्याचे प्रगतिशील शेतकरी बाळासाहेब येवले यांनी सांगितले़ (वार्ताहर)