शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

विधान परिषदेसाठी पुण्यात तिरंगी लढत

By admin | Updated: November 6, 2016 04:41 IST

विधान परिषदेच्या पुणे स्थानिक स्वराज्य संस्था प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीसाठी माजी आमदार विलास लांडे यांचे मन वळविण्यात राष्ट्रवादी कॉँग्रेसला यश आले

पुणे : विधान परिषदेच्या पुणे स्थानिक स्वराज्य संस्था प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीसाठी माजी आमदार विलास लांडे यांचे मन वळविण्यात राष्ट्रवादी कॉँग्रेसला यश आले; मात्र तांत्रिकदृष्ट्या त्यांचा अर्ज राहणार आहे. मनसे उमेदवाराचा बाद झालेला अर्ज आणि शिवसेनेची माघार, यामुळे राष्ट्रवादी कॉँग्रेस, कॉँग्रेस आणि भारतीय जनता पक्षामध्ये तिरंगी लढत रंगणार आहे. विधान परिषदेसाठी दहापैकी पाच उमेदवारांनी माघार घेतल्याने, आता पाच उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यामध्ये राष्ट्रवादी काँगे्रसचे उमेदवार अनिल भोसले, काँगे्रसचे संजय जगताप, भाजपाचे अशोक येनपुरे, राष्ट्रवादी काँगे्रसचे बंडखोर विलास लांडे आणि अपक्ष उमेदवार यशराज पारखी या पाच उमेदवारांचा समावेश आहे; मात्र, लांडे यांनी आपला अर्ज तांत्रिकदृष्ट्या राहिला असून, आपण अनिल भोसले यांचाच प्रचार करणार असल्याचे सांगितले. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी १० उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी शनिवारी अखेरचा दिवस होता. सकाळी दहा ते दुपारी २ वाजेपर्यंत एकही उमेदवार मघारीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे फिरकला नाही. दुपारी दोन नंतर आमदार लक्ष्मण जगताप यांचे समर्थक केदार (गणेश) गायकवाड माघारी घेण्यासाठी आले. गायकवाड यांच्या माघारीसाठी खासदार संजय काकडे व जगताप जातीने हजर होते. त्यानंतर खेड तालुक्याचे भाजप अध्यक्ष अतुल देशमुख यांनी पुढाकार घेऊन आळंदीचे नगरसेवक बापू थिगळे व चाकणचे नगरसेवक आॅड.प्रकाश गोरे यांचे अर्ज मागे घेतले. तर काँगे्रसचे अधिकृत उमेदवार संजय जगताप, शहरध्यक्ष रमेश बागवे, अभय छाजेड व काँगे्रस पक्षातील काही वरिष्ठ कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत गोपाळ तिवारी यांनी आपला अर्ज मागे घेतला. तिवारी यांच्या माघारी कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून जगताप यांच्यासह काँगे्रसचे सर्वच नेते पावणे चार वाजे पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये तळ ठोकून होते. शिवसेनेचे ज्ञानेश्वर खंडागळे यांनी देखील तीनला पाच मिनिटी बाकी असताना आपला अर्ज मागे घेतला. भाजपने काही खेळी करत अधिकृत उमेवाराचा अर्ज मागे घेतला असता तर शिवसेना आपला अर्ज कायम ठेवणार होती, असे खंडागळे यांनी स्पष्ट केले.लांडे यांचे माघारीनाट्य... विधान परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँगे्रसचे बंडखोर उमेदवार विलास लांडे आपला अर्ज मागे घेणार किंवा नाही, याकडे लक्ष लागले होते. माघारीची मुदत संपण्यापूर्वी काही मिनीट अगोदर लांडे यांचा प्रतिनिधी माघारीचे पत्र घेऊन निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात दाखल झाला; परंतु लांडे यांनी आपला अर्ज मागे घेण्यासाठी संबंधित व्यक्तींची अधिकृत प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करीत असल्याचे लेखी पत्र देणे आवश्यक होते. संबंधित प्रतिनिधीने हे पत्र न दिल्याने, त्याचा अर्ज घेण्यात आला नाही. यामुळे अखेर निवडणुकीच्या रिंगणात पाच उमेदवार शिल्लक राहिले.