शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी बांधवांचा अन्यायाविरोधात आक्रोश

By admin | Updated: November 14, 2016 02:05 IST

कुठे कुपोषण...कुठे उपोषण.. कुठे बलात्कार.. आदिवासी किती काळ सहन करणार अत्याचार?, एक तीर एक कमान सारे आदिवासी एकसमान, आदिवासी संस्कृती अपनाओ, विश्वको बचाओ

डिंभे : कुठे कुपोषण...कुठे उपोषण.. कुठे बलात्कार.. आदिवासी किती काळ सहन करणार अत्याचार?, एक तीर एक कमान सारे आदिवासी एकसमान, आदिवासी संस्कृती अपनाओ, विश्वको बचाओ, अशा घोषणा देत शुक्रवारी घोडेगाव (ता.आंबेगाव) येथे खामगाव तालुक्यातील पाळा आदिवासीआश्रम शाळेतील अल्पवयीन मुलींवर झालेल्या बलात्काराच्या घटनेचा निषेध करण्यासाठी आदिवासी आक्रोश मोर्चा काढण्यात आला. पाळा येथील आश्रम शाळेत घडलेल्या घटनेचा निषेध करत मुलींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. आदिवासी समाजाच्या वतीने आंबेगाव तालुका तहसीलदार यांना निवेदन सादर करण्यात आले. मोेर्चात उत्तर पुणे जिल्ह्यामधून हजारोंच्या संख्येने आदिवासीबांधव, महिला व तरुणवर्ग सामील झाला होता. बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील पाळा येथील कै. निंबाजी कोकरे या आदिवासी आश्रमशाळेत निवासी वसतिगृहात शिकणाऱ्या अल्पवयीन आदिवासी चिमुरडीवर कर्मचाऱ्यांनीच बलात्कार करून तिचा वारंवार लैंगिक छळ करण्याची घटना समोर आली. या घटनेमुळे पुन्हा एकदा आश्रमशाळांतील मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न समोर आला आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी मोर्चा काढण्यात आला. मोर्चात जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे, सुभाष मोरमारे, विजय आढारी, सुभाष तळपे, संजय गवारी, प्रकाश घोलप, जनाबाई उगले, मारुती केंगले, राजू घोडे; तर आदिवासी क्रांती संघटना, आदिवासी विकास मंडळ आंबेगाव, आदिवासी उन्नती संघटना खेड व मावळ, यशोधा फाउंडेशन अकोले, आदिवासी संस्कृती मंडळ इगतपुरी नाशिक आदी मोर्चात सहभागी झाले होते.