शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासींचा ‘रास्ता रोको’

By admin | Updated: January 23, 2016 02:36 IST

पडकईचे थकीत रक्कम द्या, रीडिंगप्रमाणे वीजेची बिलं काढा आदी मागण्या करीत आंबेगाव तालुक्यातील आदीवासींनी शुक्रवारी

तळेघर : पडकईचे थकीत रक्कम द्या, रीडिंगप्रमाणे वीजेची बिलं काढा आदी मागण्या करीत आंबेगाव तालुक्यातील आदीवासींनी शुक्रवारी मंचर भीमाशंकर रस्त्यावर तळेघर येथे रास्ता रोको आंदोलन केले. यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतुकीचा खोळंबा झाला. अखिल भारतीय किसान सभा पुणे जिल्हा समितीच्या आंबेगाव तालुका संघटनेच्या वतीने विविध समस्यांबाबत हे आंदोलन केले. रॅली काढत तब्बल दोन तास रस्त्यावर ठिय्या मारला. रीडिंग न घेता अवास्तव वीज बिले बंद करून रीडिंगप्रमाणे बिल देण्यात यावे. बिल कमी करण्यासाठी पहिल्या गुरुवारी तळेघर येथे अधिकारी नेमण्यात यावा. पेन्शनधारकांसाठी तलाठ्याच्या पंचनामा ही जाचक अट रद्द कराव्यात, आदिवासी भागामध्ये बी.एस.एन.एल. कंपनीचा अनागोंदी कारभार बंद करून नियमित विस्कळित होणारी सेवा सुरळीत व्हावी. आदिवासी भागातील प्रत्येक गावात रोजगार हमी योजना सुरू करावी. आदिवासी भागांमध्ये तलाठी, ग्रामसेवक यांच्या चालणाऱ्या मनमानी कारभारांना त्वरित आळा बसावा. आदी मागण्या यावेळी केल्या. या रास्ता रोकोसाठी आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील भीमाशंकर, पाटण, आहुपे खोऱ्यातील तमाम आदिवासी बांधव उपस्थित होते. या वेळी कामगार तलाठी एम. जे. सुडीत, महावितरणाचे प्रमोद मारबते, कृषी खात्याचे डी. एम. गायकवाड यांनी निवेदन स्वीकारल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.या वेळी अखिल भारतीय किसान सभा आंबेगाव तालुका उपाध्यक्ष राजेंद्र घोडे, सचिव अशोक पेकारी, अशोक जोशी, पाटणचे सरपंच महादू मावळे, मच्छिंद्र कढण, बबन मावळे, दिलीप मुदगुण उपस्थित होते. (वार्ताहर)दीड वर्ष होऊनही पडकईचे पैैसे नाहीतआदिवासी भागांमध्ये आदिवासी विकास प्रकल्प घोडेगाव यांच्याकडून आदिवासी भागात शेतीच्या कामासाठी कृषी विभाागामार्फत पडकई ही योजना राबविली जाते. सन २०१३-१४ या वर्षामध्ये कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून अंदाजपत्रक तयार करून योजना मंजूर झालेल्या शेतकऱ्यांना कामे करावयास सांगितली. शेतकऱ्यांनी कामे पूर्ण करूनही दीड वर्षामध्ये अद्यापही त्यास पैसै मिळाले नाहीत. पैसे न मिळाल्यामुळे त्या भागाताील आदिवासी शेतकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. मजूर पैशांसाठी शेतकऱ्यांच्या वारंवार दारात आल्यामुळे शेतकऱ्यांनी बैल, म्हैस, सोने तारण ठेवून कर्ज काढून मजुरांचे पैसे दिले आहेत. या शेतकऱ्यांना पडकईचे लवकरात लवकर पैसे मिळावेत.