शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी कुटुंबांना रेशनिंग कार्डवर केरोसीन मिळणे आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:08 IST

आंबेगाव तालुक्याचा पश्चिम आदिवासी भागातील भीमाशंकर, पाटण व आहुपे खोरी ही अत्यंत डोंगर दर्‍याखोर्‍यांमध्ये वसली आहेत. उन्हाळा, पावसाळ्यात या ...

आंबेगाव तालुक्याचा पश्चिम आदिवासी भागातील भीमाशंकर, पाटण व आहुपे खोरी ही अत्यंत डोंगर दर्‍याखोर्‍यांमध्ये वसली आहेत. उन्हाळा, पावसाळ्यात या भागांमध्ये विजेचा लपंडाव चालू असतो. या भागातील आदिवासी बांधव दिवसरात्र उजेडासाठी राॅकेलच्या बत्तीचा वापर करत असतात. विशेषत: पावसाळ्यांमध्ये वीजपुरवठा खंडित झाल्यास आदिवासी भागातील काही गावे महिना महिना अंधारामध्ये असतात. यासाठी या भागामध्ये केरोसीन मिळणे आवश्यक आहे; परंतु गेले दीड-दोन वर्षांपासून या भागामध्ये रेशनिंग कार्डवर राॅकेल मिळत नाही. ह्यामुळे आदिवासी बांधवांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. सध्या ह्या भागामध्ये उन्हाची तीव्रता वाढत आहे. त्याचप्रमाणे विजेचा लपंडावही चालू आहे. मागील आठवड्यामध्ये चार-पाच दिवस वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे आदिवासी जनतेला रात्रंदिवस अंधारात घालवावी लागली.

सध्या रात्रीच्या वेळी सर्प, विंचू या विषारी हिंस्त्रकांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या अंधाराचा फायदा घेऊन या भागामध्ये रात्रीच्या वेळी सर्पदंशाचे प्रमाण वाढले आहे. पाटण खोर्‍यामध्ये डिंभे धरणाचे विस्तीर्ण असे पाणलोट क्षेत्र पसरले आहे. डिंभे धरणाचे पाणलोट क्षेत्र असल्यामुळे या भागामध्ये मोठ्या प्रमाणात विषारी सर्प आढळतात. त्यामुळे या भागात सर्पदंशाचे प्रमाणही जास्त आहे. पावसाळ्यामध्ये विजेचा तांत्रिक बिघाड झाला असता, या भागातील आदिवासी बांधवांना महिना महिना भर अंधारात राहावे लागते. आदिवासी भागात दरवर्षी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडल्याने वीजपुरवठा खंडित होतो. वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर विद्युत विभागाकडून दहा ते पंधरा दिवस वीज सुरळीत होत नाही.

पावसाळा सोडून इतर दिवशीही काही भागामध्ये वीजपुरवठा सुरळीत नसतो. त्यामुळे रात्रीच्या वेळी प्रकाशासाठी दिवा, कंदील लावण्यासाठी केरोसीनशिवाय पर्याय नसतो. त्याचप्रमाणे आदिवासी भागातील बहुतेक कुटुंबे गॅसधारक नाहीत. जे गॅसधारक आहेत, त्यांना गॅस टाकी भरण्यासाठी आर्थिक परिस्थिती नसल्याने गॅसच्या टाक्या रिकाम्या अवस्थेत पडून आहेत. त्यामुळे आदिवासी भागातील सर्व कुटुंबांना रेशनिंग कार्डवर विशेष बाब म्हणून केरोसीन उपलब्ध करून द्यावे, अशा आशयाचे निवेदन आंबेगाव तालुका केरोसीन व रेशनिंग संघटनेने लेखी निवेदनाद्वारे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ व जिल्हाधिकारी यांच्याकडे केली असल्याचे संघटनेचे अध्यक्ष सुरेश घोलप यांनी सांगितले.

तळेघर वार्ताहार संतोष जाधव