शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी सक्तीच्या भूमिकेवरून साहित्यिक एकवटले; लेखक, कवी महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार परत करणार
2
Assembly Bypoll Result 2025: पोटनिवडणुकांचे निकाल! गुजरातमध्ये एका जागेवर आप भाजपाला टक्कर देतेय; पंजाबमध्ये संजीव अरोरा आघाडीवर
3
सोनम रघुवंशीला 'वाचवणारा आणि लपवणारा' लोकेंद्र तोमर कोण? राजा हत्याकांडात आणखी एक मोठा खुलासा
4
Devendra Fadnavis: राहुल गांधींना मेक इन इंडिया माहिती नाही, त्यांनी गृहपाठ करायला हवा; फडणवीसांचा टोला!
5
तुमचा पैसा 'रॉकेट' बनवणार! 'या' ५ म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याची हीच योग्य वेळ? पाहा संपूर्ण यादी!
6
पुतण्याच्या प्रेमात काकी झाली वेडी, पती आणि तीन वर्षांच्या मुलीला सोडलं, पुतण्यासोबत लग्न केलं
7
नितीशकुमारांची सत्ता धोक्यात? नव्या सर्व्हेतून धक्कादायक 'लाट'; बिहार निवडणुकीपूर्वीच....
8
Maharashtra Politics : ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसणार, भास्कर जाधव मोठा निर्णय घेणार?, संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
9
भारतासोबतच्या सिंधू जल करार वादात OIC ची एन्ट्री; ५७ इस्लामिक देशांचा पाकिस्तानच्या सूरात सूर
10
युनूस यांची खेळी, भारताविरोधी षडयंत्र; बांगलादेशात पाकिस्तानी ISI हस्तकाला मोठी जबाबदारी
11
जगभर: डोनाल्ड ट्रम्प याची 'दादागिरी', अमेरिकेत भारतीय प्राध्यापकांनाही ‘बंदी’!
12
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
13
पुण्याच्या नळ स्टॉप स्टेशनवरुन पकडली मेट्रो, प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याला ओळखलंत का?
14
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
15
Iran Israel War: इराण-इस्रायल युद्धाचा परिणाम नोकऱ्यांवरही, कंपन्यांमध्ये भरती प्रक्रिया थांबली; कर्मचारीही चिंतेत
16
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
17
Lalit Upadhyay: भारतासाठी दोन ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती!
18
पहिल्या कसोटीत इंग्लंडला एवढ्या धावांचं आव्हान दिल्यास भारताचा विजय निश्चित, असं आहे समीकरण 
19
राज्याचा दर्जा न दिल्यास सर्वोच्च न्यायालयात जाणार; फारुक अब्दुल्ला यांचा केंद्र सरकारला इशारा
20
महागाईचा काळ... बँक FD चे कमी व्याजदर! 'या' ५ सरकारी योजना तुमचं नशीब बदलतील, वाचा संपूर्ण माहिती

वादळी पावसामुळे पडली झाडे

By admin | Updated: May 12, 2016 01:41 IST

शहर व उपनगरांमध्ये बुधवारी दुपारी वादळी वाऱ्यासह पाऊस पडला. अर्धा तास पडल्यानंतर पाऊस मात्र गायब झाला. वादळी पावसामुळे १४ ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्या

पुणे : शहर व उपनगरांमध्ये बुधवारी दुपारी वादळी वाऱ्यासह पाऊस पडला. अर्धा तास पडल्यानंतर पाऊस मात्र गायब झाला. वादळी पावसामुळे १४ ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्या. शनिवार पेठेत घरावर झाड पडले तर पुणे स्टेशनला चारचाकी वाहनावर झाड पडल्याने वित्तहानी झाली.सोमवारी मध्यरात्री वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडला होता. मंगळवारीही दिवसभर ढगाळ हवामान होते. मात्र पाऊस पडला नाही. आज सकाळपासून ढगाळ हवामान होते. दुपारी अचानकपणे काळे ढग दाटून येत अडीच वाजण्याच्या सुमारास वादळी वारा सुटला आणि पावसास सुरुवात झाली. काही ठिकाणी पावसास जोर होता, तर काही ठिकाणी पावसाची एक-दोन सरीच पडल्या. शहरातील विविध पेठांमध्ये, दापोडी, बोपोडी, खडकी, येरवडा, पुणे स्टेशन, कोथरूड, वारजे, सिंहगड रस्ता, वाघोली, वडगाव धायरी आदी भागांमध्ये जोरदार पाऊस पडला. शिवाजीनगर येथे सायंकाळी साडेपाचपर्यंत ४ मिमी पाऊस पडल्याची नोंद पुणे वेधशाळेत झाली.