शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

खोरमधील झाड झाले सावलीचा आधार

By admin | Updated: April 25, 2016 02:12 IST

खोर (ता. दौंड) परिसरातील खिंडीचीवाडी येथील श्री गणेश मंदिरा जवळील एक वटवृक्ष गेल्या एकोणतीस वषार्पासून माणसांना, जनावरांना, वाटसरूंना दुष्काळच्या काळात सावलीचा आश्रय देत आहे.

खोर : खोर (ता. दौंड) परिसरातील खिंडीचीवाडी येथील श्री गणेश मंदिरा जवळील एक वटवृक्ष गेल्या एकोणतीस वषार्पासून माणसांना, जनावरांना, वाटसरूंना दुष्काळच्या काळात सावलीचा आश्रय देत आहे. या वृक्षाने तब्बल २९ वषार्पासूनची परंपरा जोपासली आहे. या वटवृक्षा विषयी माहिती देताना सामाजिक कार्यकर्ते अंकुश चौधरी म्हणाले की, शंकर गेनबा चौधरी (गुरूजी) यांनी सन १९८७ मध्ये हे झाड लावले आहे. या झाडाची चांगल्या प्रकारे वषार्नूवर्ष जोपासना करून हे झाड सध्याच्या काळात चांगल्या प्रकारे सुस्थितीत असून हे झाड अनेक लहान मुलांपासून वयोवृध्दांपर्यंत आश्रयाचे स्थान बनले आहे. शाळेच्या सुट्टयांच्या दिवसात मुले या झाडाच्या पारूंब्याला झोके घेत खेळ खेळत असतात. तसेच सुरपाट्यासारखा खेळ देखील या झाडाखाली खेळला जात असतो. वटपौर्णिमेच्या दिवशी महिला या वटवृक्षाला दोरखंड बांधून पुजा करत असतात. एक चांगल्या प्रकारचे शाळेच्या सुट्टयांच्या दिवसातील मुलांचे निसर्गरम्य ठिकाण झाले आहे. या ऊन्हाळयाच्या दिवसात दुपारच्या वेळेस जनावरे दिवसभर चारा, पाणी घेवून दुपारच्या वेळेत या वटवृक्षा खाली येवून सुखद गारव्याचा अनुभव घेत असतात. या वटवृक्षाच्या जवळपास २0 ते २५ पारूंब्या या जमिनीमध्ये खोलवर गेलेल्या असून हे वटवृक्ष सध्याच्या काळात चांगल्या प्रकारे हिरवेगार पानांनी बहरून दुष्काळाच्या काळात वाटसरूंच्या तसेच ग्रामस्थांच्या आश्रय देत आहे.