शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ताम्हिणी घाटातील प्रवास होणार सुखकर

By admin | Updated: May 7, 2017 03:13 IST

पुणेकरांना कोकणाशी व कोकणाला पुण्याशी जोडणारा सर्वांत जवळचा रस्ता म्हणून ओळख असलेला पुणे-महाड हा राज्यमार्ग. आता

लोकमत न्यूज नेटवर्कपौड : पुणेकरांना कोकणाशी व कोकणाला पुण्याशी जोडणारा सर्वांत जवळचा रस्ता म्हणून ओळख असलेला पुणे-महाड हा राज्यमार्ग. आता या रस्त्याचा समावेश राष्ट्रीय महामार्गात झाला आहे. त्याला ७५३ एफ हा क्रमांक देण्यात आला असून, वेगवेगळ्या टप्प्यांवर काम करण्यात येणार आहे. या भागात पडणाऱ्या कमाल पावसाचा विचार करून संपूर्ण रस्ता सिमेंट-काँक्रीटचा करण्यात येणार आहे. वाढत्या रहदारीचा विचार करून रुंदीकरण होणार आहे. याबाबत अधिक माहिती देताना पौड बांधकाम विभागाचे अधिकारी गायकवाड म्हणाले, की पुढील काळात हा संपूर्ण रस्ता सिमेंट काँक्रिटचा व ७ मीटर रुंदीचा होणार आहे. दोन्ही बाजूने दीड दीड मीटर डांबरी साईडपट्ट्या करण्यात येणार असून त्यामुळे एकूण १० मीटर रुंदीचा होणार आहे. त्यामुळे भविष्यात छोट्या चारचाकी, दुचाकी वाहनांबारोबरच पुणे ते रोहा एमआयडीसी असा प्रवास करणाऱ्या अवजड वाहनांचाही प्रवास अधिक सुखकर होणार आहे. याशिवाय भूगाव, पौड या ठिकाणच्या बाह्यवळण रस्त्याचा प्रश्नही प्रशासन स्तरावर लवकरच मार्गी लागणार असल्याने या ठिकाणी होणारी वाहतूककोंडी संपणार आहे. नवीन रुंदीकरणाचे काम होत असताना या वळण रस्त्याचेही पुरेसे रुंदीकरण व्हावे, ही अपेक्षा माजी जि.प. सदस्य सुभाष अमराळे यांनी व्यक्त केली. चांदणी चौकात आवश्यक उड्डाणपुलाची निर्मिती करून येथील वाहतूक समस्या लवकरच संपुष्टात येईल, असा विश्वास वाटतो. महानगरपालिका हद्दीतील रस्त्याच्या व उड्डाणपूल कामाच्या खर्चातील साधारणत: ४५० ते ५०० कोटींचा खर्च महानगरपालिका उचलणार असल्याने येथील काम लवकरच मार्गी लागेल, असे नगरसेवक दिलीप वेडे पाटील यांनी सांगितले. सध्या हा रस्ता पुणे ते पौडपर्यंत सात मीटर रुंद आहे. पुढे मुळशी ते महाडपर्यंत हा रस्ता साडेपाच मीटरच रुंद असल्याने वाहतुकीला अडचण होते. विशेषत: अवजड वाहतुकीला पावसाळ्यात मोठी अडचण मिर्माण होते. अरुंद रस्त्यामुळे या मार्गावर सातत्याने लहान मोठे अपघात घडतच असतात. सध्या दररोज किमान एक ते दोन असे लहान मोठे अपघात घडण्याचे प्रमाण आहे. ही समस्या टाळण्यासाठी या रस्त्याचे रुंदीकरण करणे महत्वाचे आहे.