शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

करडे येथील यात्रा उत्साहात

By admin | Updated: November 17, 2016 02:05 IST

करडे (ता. शिरूर) येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथ देवाचा यात्रा महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला, तर सुट्या पैशांअभावी अनेकांना यात्रेचा आनंद मोकळेपणाने लुटता आला नाही.

निमोणे : करडे (ता. शिरूर) येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथ देवाचा यात्रा महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला, तर सुट्या पैशांअभावी अनेकांना यात्रेचा आनंद मोकळेपणाने लुटता आला नाही.करडे -लंघेवाडी -चव्हाणवाडी (ता. शिरूर) सह पंचक्रोशीतील ग्रा. श्री भैरवनाथ देवाचा वार्षिक यात्रा महोत्सव नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.सोमवार, दि. १४ रोजी श्रींची महापूजा, रात्री ८.००वा. श्रींस पोषाखविधी, पालखीची मिरवणूक व रात्री १२.०० ते पहाटे पाच वाजेपर्यंत सत्संग आणि संगीत भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. त्याचप्रमाणे रात्री १०. ०० कै. तुकाराम खेडकर सह पांडुरंग मुळे मांजरवाडीकर यांचा लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम झाला.यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य राहुल पाचर्णे, शिरूर तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष रामभाऊ सासवडे, उपसरपंच व यात्रा कमिटीचे अध्यक्ष गणेश रोडे, माजी सरपंच बाळासाहेब बांदल, पोपटराव लंघे, राजेंद्र जगदाळे पाटील, संतोष लंघे, बाळासाहेब वाळके, सुधीर जगदाळे, बबन वाळके, विशाल घायतडक यांसह ग्रामस्थ कुस्तीप्रेमी मोठया प्रमाणावर उपस्थित होते. पंच म्हणून पोपटराव लंघे, मधुकर घायतडक, फक्कड रोडे, कैलास पाचर्णे, बाळासाहेब घायतडक यांनी काम पाहिले.चालू वर्षी नुकतेच ग्रामस्थांनी दीड कोटी रुपये खर्च करून ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिर उभारले आहे व परिसराचा विकास केला आहे. या नवीन मंदिर, प्रवेशव्दारासह सार्वजनिक इमारतींवर केलेली नयनरम्य रोषणाई, नवीन आखाडा, खाऊ, खेळण्यांची दुकाने त्यामुळे या वर्षाच्या यात्रेला विशेष रंगत आली होती.(वार्ताहर)