पिंपरी : सातारा, फलटण भागात दरोडे टाकून दहशत निर्माण करणा:या प्रकाश चव्हाण या सराईत गुंडाचा दरोडयापासून ते स्वत:ची टोळी स्थापन करण्यार्पयतचा गुन्हेगारी जगताचा प्रवास आहे. खून,खूनाचा प्रयत्न, हप्ते वसूली अशा स्वरूपाचे विविध गुन्हे दाखल असलेला सराईत गुंड चव्हाण याच्यावर 2क्क्7 मध्ये मोक्का दाखल करण्यात आला होता. राजकीय वरदहस्त लाभल्याने कामगारनेता होण्यार्पयतची मजलही त्याने मारली होती. पिंपरी चिंचवड, मावळ, चाकण, पिरंगुट या औद्योगिक परिसरात कारखान्यांमधील कंत्रटदारीत गुंडगिरीचा शिरकाव झाल्याने कंत्रटे मिळविण्यावरून तसेच वर्चस्व प्रस्थापित करण्यावरून एकमेकांवरील हल्याच्या घटना वाढल्या होत्या. गोळीबाराच्याही घटना घडत होत्या, चव्हाण या गुंडाची हत्या ही त्याचीच परिणीती मानली जात आहे.
दरोडय़ापासून स्वत:ची टोळी करण्यार्पयत गुंडगिरीचा प्रवास
By admin | Updated: December 11, 2014 00:40 IST
सातारा, फलटण भागात दरोडे टाकून दहशत निर्माण करणा:या प्रकाश चव्हाण या सराईत गुंडाचा दरोडयापासून ते स्वत:ची टोळी स्थापन करण्यार्पयतचा गुन्हेगारी जगताचा प्रवास आहे.
दरोडय़ापासून स्वत:ची टोळी करण्यार्पयत गुंडगिरीचा प्रवास
सातारा जिल्ह्यात तसेच फलटण तालुक्यात 1993 मध्ये त्याने स्वत:चे गुन्हेगारी साम्राज्य पसविण्यास सुरूवात केली. या भागात त्याने दरोडे टाकून दहशत निर्माण केली. त्यानंतर 1994 मध्ये पिंपरी चिंचवडमधील भोसरी लांडेवाडीतील नगरसेवक अनिल हेगडे याच्या खून प्रकरणात त्याचे नाव पुढे आले. गुन्हेगारी जगताशी त्याचा सक्रीय सहभाग असल्याचे भोसरीतील हेगडे खून प्रकरणापासून शहरातील नागरिकांच्या लक्षात आले. भोसरी, पिंपरी, निगडी, येरवडा, पौड, पनवेल आदी ठिकाणच्या पोलिस स्टेशनमध्ये त्याच्याविरूद्ध विविध स्वरूपाचे फौजदारी गुन्हे दाखल झाले. विविध न्यायालयात ते खटले प्रलंबित आहेत. 2क्क्7 मध्ये संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत (मोक्का) त्याच्यावर कारवाई करण्यात आली. गुन्हेगारी क्षेत्रतील त्याचा दबदबा वाढत गेला तसा राजकीय आश्रयही त्याला मिळत गेला. राजकीय वरदहस्तामुळे त्याच्यावरील मोक्काअंतर्गतची कारवाई स्थगित होण्यास मदत झाली.
2क्क्7 मध्ये महापालिका निवडणुकीच्या रिंगणातही त्याने नशिब अजमावले. त्यात अपयश आल्याने गुन्हेगारी आणि कामगार क्षेत्रतच त्याने लक्ष केंद्रित केले. गवळी टोळीशी काही काळ त्याचे नाव जोडले गेले होते, परंतू अलिकडच्या काळात त्याने स्वत:ची टोळी स्थापन करून गुन्हेगारी जगतात त्याचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले होते. पिंपरी, निगडी, अजंठानगर, भोसरी, पिंपरी या भागात त्याने गुन्हेगारीचे जाळे पसरवले होते. (प्रतिनिधी)
4राजकीय नेत्यांकडून आश्रय मिळत गेल्याने 2क्क्8 मध्ये त्याला कामगार संघटनेचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. औद्योगिक क्षेत्रत कमाईला वाव आहे, हे लक्षात घेऊन 2क्1क् मध्ये त्याने असंघटित कामगारांसाठी स्वत:ची संघटना स्थापन केली. त्या माध्यमातून त्याने औद्योगिक क्षेत्रत चागंलाच जम बसवला.