शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

वाहतूककोंडीने वैतागले पुणेकर

By admin | Updated: July 29, 2014 03:25 IST

सकाळपासून सुरू असलेली पावसाची रिपरिप, त्यामुळे एरवी दुचाकीवरून कामाला जाणाऱ्या अनेकांनी आपल्या मोटारी बाहेर काढल्या़ बसने प्रवास करणाऱ्यांनी रिक्षाचा आसरा घेतला़

पुणे : सकाळपासून सुरू असलेली पावसाची रिपरिप, त्यामुळे एरवी दुचाकीवरून कामाला जाणाऱ्या अनेकांनी आपल्या मोटारी बाहेर काढल्या़ बसने प्रवास करणाऱ्यांनी रिक्षाचा आसरा घेतला़, त्यामुळे पाऊस आणि आठवड्याचा पहिला दिवस असल्याने कामाला बाहेर पडलेल्या पुणेकरांना आज सकाळपासूनच ‘ट्रॅफिक जाम’चा अनुभव घ्यावा लागला़ शहरातील सर्व महत्त्वांच्या चौकांमध्ये वाहतुकीची कोंडी झाल्याचे सकाळी १० वाजल्यापासूनच दिसून येत होते़ दुपारी काही वेळ वाहने कमी झाल्याने वाहतूककोंडी कमी झाली होती़ त्यानंतर पुन्हा सायंकाळी ४ नंतर कार्यालयातून घरी जाण्यासाठी नागरिक बाहेर पडल्याने शहरातील सर्व रस्ते वाहनांनी भरून गेले असल्याचे दिसून येत होते़ नेहमी २० ते २५ मिनिटे लागणाऱ्या अंतरासाठी आज दीड तास लागत होता. औंध, बाणेरकडून येणाऱ्या वाहनांना पुणे विद्यापीठ चौकात नेहमीच वाहतूककोंडीचा सामना करावा लागतो़ आज मात्र या चौकातील कोंडी वाहनचालकांची सहनशीलता पाहत होती़ दोन्ही रस्त्यांवर आज सकाळी ११ ते १२ च्या दरम्यान एक किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या़ चौकातील वाहतूक पोलिसांनी सिग्नल बंद करून शेवटी हाताने वाहतूक नियमन करून ही वाहतूककोंडी फोडण्याचा प्रयत्न केला; पण वाहनांची संख्याच इतकी प्रचंड होती, की त्यांचे प्रयत्न विफल ठरत होते़ नळस्टॉप चौक, सिमला आॅफिस, जेधे चौक, खंडोजीबाबा चौक, इंजिनिअरिंग कॉलेज चौक, जंगली महाराज रोड, फर्ग्युसन रोड, मालधक्का चौक, शाहीर अमर शेख चौक असे शहरातील जवळपास सर्वच रस्ते वाहनांनी भरून वाहत होते़ पाऊस असल्याने वाहनांचा वेग कमी होता़ त्यात नेहमी दुचाकीने जाणाऱ्या अनेकांनी पावसामुळे मोटारी बाहेर काढल्या़, त्याचा परिणाम रस्त्यावरील मोटारींच्या संख्येत मोठी वाढ झाली होती़ (प्रतिनिधी)