शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
2
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
3
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
4
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
5
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
6
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
7
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
8
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
9
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
10
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
11
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
12
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
13
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
14
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
15
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
16
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
17
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ
18
क्या बात! रितेश देशमुखच्या आईसाहेबांनी बल्बच्या प्रकाशात घेतलं ड्रॅगन फ्रूटचं पीक; सूनबाईंना कौतुक, शेअर केला व्हिडीओ
19
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

देहूतील वाहतूककोंडी होणार दूर

By admin | Updated: June 4, 2017 05:26 IST

राज्यातील अग्रगण्य तीर्थक्षेत्र असलेल्या देहूगावचे रुपडे सुमारे पावणे दोनशे कोटी रुपयांचा विकास आराखड्यातील विकासकामांमुळे बदलत आहे. नवीन पुलांमुळे

- लोकमत न्यूज नेटवर्क

देहूगाव : राज्यातील अग्रगण्य तीर्थक्षेत्र असलेल्या देहूगावचे रुपडे सुमारे पावणे दोनशे कोटी रुपयांचा विकास आराखड्यातील विकासकामांमुळे बदलत आहे. नवीन पुलांमुळे देहूगावला पुलांमुळे गावातील वाहतूककोंडी संपुष्टात येणार असून पुलाचे गाव म्हणूनही ओळख मिळणार आहे.सध्या देहूमध्ये दोन पूल वापरात आहेत, नव्याने बांधलेले दोन पूल पूर्ण झाले असून काही दिवसांत वाहतुकीसाठी खुले करण्यात येतील. एका पुलाचे काम प्रगतिपथावर आहे. मात्र, आणखी दोन पूल प्रस्तावित असल्याने देहूला ही नवी ओळख मिळणार आहे. देहूमध्ये कार्तिकी एकादशी, आषाढी वारी व तुकाराम बिजोत्सव या तीन मोठ्या यात्रा भरतात. या तिन्ही यात्रांना लाखो भाविक उपस्थित राहतात. देहूमध्ये वर्षभरात लाखो भाविकही संत तुकाराम महाराजांच्या दर्शनासाठी येत असतात. लोकांचे जीवनमान उंचावल्याने आपली वाहने घेऊन कुटुंबीयांसह देव दर्शनाला येणाऱ्या लोकांचे प्रमाणही वाढले आहे. गावातील अरुंद रस्ते, वाढलेली वाहतूक यामुळे गावात वाहतूककोंडी मोठ्या प्रमाणात होते. यावर उपाय व भविष्याची तरतूद म्हणून देहूचा विकास आराखड्यातंर्गत सिद्धेश्वर मंदिराजवळ, गाथामंदिराजवळ व खालुंब्रे व देहूच्या मार्गावर असे तीन पुलांचा प्रस्ताव तयार करण्यात आला. त्यापैकी दोन पुलांचे काम पूर्ण झाले आहे. खालुंब्रे येथील पूल प्रस्तावीत असून भविष्यात त्याचे बांधकाम करण्यात येईल. सांगुर्डी व बोडकेवाडीला जोडणाऱ्या इंद्रायणी नदीवरील पुलाचे बांधकाम वेगाने सुरू आहे. सिद्धेश्वर मंदिराच्या मागील रस्ता १.२ वरील पूल क्रमांक ३.१ हाही ११२ मीटर लांब, १२ मीटर रुंद व १० मीटर उंच आहे. हा पूल लोखंडी सळयांमध्ये बांधला आहे. पूल पाच खांबावर उभा असून सहा गाळे आहेत. प्रत्येक गाळा हा १८ मीटरचा आहे. याचा पाया ओपन कॉंक्रीट पद्धतीने बांधण्यात आला असून स्लॅब सॉलीड पद्धतीचा आहे. येथेही दोन्ही बाजूला पाच फुटाचा पादचारी मार्ग व मध्ये दोन लेनचा रस्ता वाहनांसाठी आहे. हा पूलदेखील बांधून तयार आहे. मात्र, येथील दोन्ही बाजूच्या रस्त्याचे काम पूर्ण न झाल्याने तो वाहतुकीस खुला करण्यासाठी आणखी काही दिवस देहूकरांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. या पुलांमुळे देहूतील वाहतूककोंडी पूर्णपणे संपणार असून गावाच्या विकासालाही वेग येणार आहे. गावात उद्योग व्यवसायही वेगाने वाढतील त्यामुळे रोजगार वाढतील आणि लोकांचे राहणीमानही उंचावणार आहे. तळेगाव, चाकण एमआयडीसीतील व परिसरातील वाहने देहूतूनच ये-जा करतात. त्यामुळे विशिष्ठ वेळी गावातील रस्त्यांवर वाहतूककोंडी होते. या पुलांमुळे गावाबाहेरून वाहने जाणार असल्याने गावातील रस्ते वाहतूककोंडीमुक्त आणि सुरक्षित होणार आहेत. नवीन समांतर पूल : दीडशे फूट रुंदीचादेहूमध्ये सुमारे ५० वर्षांपूर्वी बांधलेला दगडी खांबावर उभारलेला पूल आहे. या पुलाचा स्लॅब कमकुवत झाल्याने त्याच्या शेजारी आठ वर्षांपूर्वी नवीन समांतर पूल बांधण्यात आला. सध्या देहूत इंद्रायणी नदीवर चार पूल आहेत. बोडकेवाडी-सांगुर्डी गावांना जोडणाऱ्या पुलाचे कामही प्रगतिपथावर आहे. प्रस्तावित रिंग रोडसाठी आणखी सहा पदरी रस्त्यासाठी दीडशे फूट रुंदीचा मोठा पूल होण्याची शक्यता आहे. विकास आराखड्यांतर्गत खालुंब्रे गावाला जोडणारा आणखी एक पूल प्रस्तावित आहे, असे एकूण सात पूल देहूमधून जात आहेत. या पुलांमुळे देहूला तीर्थक्षेत्राबरोबरच पुलांचे गाव म्हणूनही नवी ओळख होणार आहे.असा आहे उड्डाणपूल गाथा मंदिर परिसरातील रस्ता १.१, इंद्रायणीवरील पुलाची लांबी ११२ मीटर, उंची १२ मीटर व रुंदी १२ मीटर असून साडेसात मीटरची संरक्षक भिंत आहे. १२ मीटर रुंदीमध्ये दोन्ही बाजूला पाच फुटांचे पादचारी मार्ग आहेत. दोन लेन वाहनांसाठी असणार आहे. पूल चार खांब आणि पाच गाळ्यांचा असून प्रत्येक गाळ्याची रुंदी साधारण २२ मीटर आहे. ताण व वजन सहन करणाऱ्या लोखंडी ताण केबल वापरण्यात आल्या आहेत. २० आय गर्डल्स वापरले आहेत. पुलाच्या बांधकामाची मुदत ३१ मार्च २०१७ पर्यंत होती. हा पूल मुदतीत बांधूनही झाला आहे. मात्र, त्यापुढील रस्त्याचे काम अद्याप पूर्ण न झाल्याने वाहतुकीसाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.