शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

त्या विद्युत कर्मचार्‍यांची बदली

By admin | Updated: May 7, 2014 01:12 IST

कर्मचा-याच्या आत्महत्येसाठी जबाबदार असल्याचा आरोप असलेल्या अधिकारी व कर्मचा-यांची महावितरणे अखेरीस बदली केली आहे.

पुणे : अधिकार्‍यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केलेल्या विद्युत कर्मचार्‍याची पत्नी मिनाक्षी दिलीप मगर यांनी महावितरणच्या रास्ता पेठेतील कार्यालयासमोर उपोषण केल्यानंतर महावितरणने त्या अधिकारी व कर्मचार्‍यांची बदली केली. मात्र पतीच्या मृत्युस कारणीभूत असलेल्या व्यक्तींची केवळ बदली न करता त्यांना निलंबित करुन अटक करावी अशी मागणी करीत मंगळवारी (दि.६) रास्तापेठेतील महावितरणच्या मुख्यालयासमोर त्यांनी पुन्हा आंदोलन केले. हडपसर उपविभागात (ग्रामीण) तंत्रज्ञ दिलीप मगर यांनी वरीष्ठांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली होती. या कार्यालयातील शिवाजी भामघर यांचा विद्युत अपघातात मृत्यु झाला होता. या अपघाताची जबाबदारी स्वीकारण्यासाठी माझ्या पतीवर दबाव टाकण्यात येत होता. यातून आलेल्या नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केल्याची तक्रार मिनाक्षी यांनी महावितरणचे मुख्य अभियंता निळकंठ वाडेकर यांच्याकडे केली आहे. या प्रकरणी सहाय्यक अभियंता किशोर शिंदे, शाखा अभियंता ए. आर. लांजेवार, कनिष्ठ लिपिक एस. के. दरेकर यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. न्यायालयाकडून जामिन मिळाल्यानंतर ते पुन्हा कामावर रुजु झाले आहेत. त्यांच्याकडून कार्यालयीन कागदपत्रात खाडाखोड करुन माझ्या पतीविरुद्ध ते खोटे रेकॉर्ड तयार करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संबंधितांवर निलंबनाची कारवाई करुन खातेनिहाय चौैकशी करावी अशी मागणी करण्यात आली होती. महावितरणने शिंदे यांची पुणे विभागात (इन्फ्रा), लांजेवार यांची मुळशी उपविभागातील पौड शाखेत,तर दरेकर यांची तळेगाव उपविभागात बदली केली आहे. लीगल राईट्स सोसायटीचे अध्यक्ष अनुप अवस्थी म्हणाले, ऊर्जा विभाग दोषींवर कारवाई करण्यास टाळाटाळ करीत आहे. या विरोधात महावितरण व ऊर्जा विभागातील वरीष्ठ अधिकार्‍यांविरोधात मानवाधिकार आयोगाकडे तक्रार करण्यात येणार आहे.