शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मोराची चिंचोलीत तस्करी आणि शिकारही

By admin | Updated: December 1, 2014 23:25 IST

चिंचोशी (ता.खेड) परिसरात मोरांचे वास्तव्य वाढत आहे. मात्र रात्रीच्या वेळी अज्ञात लोकांकडून मोरांची शिकार होत असल्याचे येथील ग्रामस्थांकडून समजते

भानुदास प-हाड, शेलपिंपळगावचिंचोशी (ता.खेड) परिसरात मोरांचे वास्तव्य वाढत आहे. मात्र रात्रीच्या वेळी अज्ञात लोकांकडून मोरांची शिकार होत असल्याचे येथील ग्रामस्थांकडून समजते. त्यामुळे मोरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, यामुळे मोरांचे दुसऱ्या जागी स्थलांतर होण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे वन विभागाने करडी नजर ठेवून वेळीच मोरांची तस्करी करणाऱ्यांच्या मुसक्या आवळविण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे. खेड तालुक्याच्या पूर्व भागातील चिंचोशी हे गाव डोंगराच्या लगत वसलेले असून, चासकमान धरणातील पाणी डाव्या कालव्यामार्फत या गावातून पुढे जाते. अन्न, पाणी, निवारा व भटकंतीसाठी मोकळे रान यांचा संगम येथे होतो. त्यामुळे अल्पप्रमाणात मोर या ठिकाणी पाहायला मिळायचे. गेल्या काही महिन्यांपासून चिंचोशी गावात मोरांचे वास्तव्य वाढू लागले असून, अल्प संख्य असलेले मोर जादा स्वरूपात आढळून येऊ लागले आहेत. गावातील ग्रामस्थ मोरांचे संगोपन करण्यासाठी पुढाकार घेत असल्याने मोरांच्या वास्तव्याचा प्रश्न सुटून मोर बिनधास्तपणे भटकंती करतात. परंतु, गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्या वेळी डोंगराळ भागात मोरांच्या जोर-जोराने ओरडण्याचा आवाज कानी पडतो. त्यामुळे काही अज्ञात लोकांकडून मोरांची शिकार होत असल्याची शक्यता स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत. रात्रीच्या वेळी हे अज्ञात लोक डोंगराळ भागात जाळी लावून दडी मारून बसत असून, पहाटेच्या वेळी गाडीवरून पोबारा करत आहेत. त्यांच्याकडे शिकारीचे साहित्य असल्याने ते मोरांचीच शिकार करतात, ही शक्यता अजिबात नाकारता येत नाही.