शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

रखडलेल्या कामांचा अडथळा, रावेत, विकासनगर, किवळे भागांत जाणारे वाहनचालक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 01:02 IST

मुंबई -बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावरील देहूरोड ते कात्रज बाह्यवळण रस्त्यावरील देहूरोड ते किवळे-रावेत दरम्यानच्या सेवा रस्त्यांची रखडलेली कामे, झालेली दुरवस्था, विकासनगर, रावेत, किवळे -विकासनगर भागात खोदून ठेवलेल्या पावसाळी गटारी, तसेच ओढे व नाल्यांवरील पुलांची रखडलेली व अद्याप सुरू न झालेल्या कामांमुळे महामार्गावरील वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे.

किवळे : मुंबई -बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावरील देहूरोड ते कात्रज बाह्यवळण रस्त्यावरील देहूरोड ते किवळे-रावेत दरम्यानच्या सेवा रस्त्यांची रखडलेली कामे, झालेली दुरवस्था, विकासनगर, रावेत, किवळे -विकासनगर भागात खोदून ठेवलेल्या पावसाळी गटारी, तसेच ओढे व नाल्यांवरील पुलांची रखडलेली व अद्याप सुरू न झालेल्या कामांमुळे महामार्गावरील वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. सेवा रस्त्यांवर काही व्यावसायिकांनी अतिक्रमण केल्याचे चित्र दिसून येत असून, महामार्गावर मार्गदर्शक, स्थलदर्शक फलक व सुरक्षेबाबत माहिती देणारे फलक लावलेले नसल्याने अपघातांना निमंत्रण मिळत आहे. काही स्थलदर्शकफलक चुकीच्या ठिकाणी लावले असल्याने संभ्रम निर्माण होत आहे.राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारचे देहूरोड येथील पोलीस ठाण्याच्या नजीकचा चौक ते सातारा (किमी 725 ते किमी 865) दरम्यानचे एकूण १४० किलोमीटर रस्त्याचे सहा पदरीकरणाचे काम एक आॅक्टोबर २०१० रोजी सुरू झाले असून, सदर काम पूर्ण करण्यासाठी ३० मार्च २०१३ पर्यंतची मुदत दिली होती.कामासाठी १७२४ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित होता. या कामात मुख्य सहा पदरी रस्त्याच्या कामांसह महामार्गाच्या दोन्ही बाजूंना सेवा रस्ता बांधण्याचे नियोजन करण्यात आलेले होते. संबंधित ठेकेदार वारंवार विविध कारणे दाखवून कामाची मुदत वाढवून घेत आहे. वाढविलेली मुदत संपण्यास एक महिन्याचा अवधी उरलेला असताना अद्यापही विविध कामे पूर्ण झालेली नसून, काही कामांना सुरुवातही झालेली नसल्याचे लोकमतने केलेल्या पाहणीत आढळून आले आहे. देहूरोड येथील पोलीस ठाण्यानजीकच्या सेन्ट्रल चौकापासून शितळानगर (मामुर्डी) येथील भुयारी मार्गावरील पुलापर्यंत देहूरोड कॅन्टोन्मेंटच्या हद्दीत महामार्गाच्या दुतर्फा सर्वत्र जागा उपलब्ध आहे. अद्यापही सेवा रस्त्याच्या कामास सुरुवात करण्यात आलेली नाही. मामुर्डी येथील भुयारी मार्गावरील पुलाचे काम अर्धवट स्थितीत आहे. शितळानगर येथील कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या वाहन प्रवेशकर वसुली केंद्रापासून जवळच सेवा रस्ता बांधण्यासाठी सिमेंट पाइप टाकून मोरीचे बांधकाम केले. मात्र, गेल्या दोन वर्षांत पुढे काहीही काम केले नाही. काही भागात सेवा रस्त्याचे सुरू केलेले काम पुन्हा बंद करण्यात आल्याचे दिसत आहे.>पथदिवे : उजेड कधी पडणार याबाबत संभ्रमदेहूरोड-कात्रज महामार्गावर पथदिवे बसविण्यात आले असून, संबंधित दिवे सुरू कधी होणार याबाबत नागरिक सवाल उपस्थित करीत असून, महापालिका हद्दीत किवळे जकात नाका ते रावेत पवना नदीपर्यंत चार किलोमीटर अंतरात तीन हायमास्ट दिव्यांसह फक्त पाच-सहा पथदिवे सुरू असल्याचे दिसून आले आहे. कॅन्टोन्मेंट हद्दीपासून विकासनगर पेट्रोल पंपापर्यंत सेवा रस्त्याचे काम पूर्ण होत आले असताना ओढ्यावरील पुलाचे काम अर्धवट सोडलेले असून, त्या ठिकाणी रात्रीच्या वेळी दुचाकी वाहने पडल्याच्या घटना घडल्या आहेत. विकासनगर येथील शिंदे पेट्रोल पंप ते इंद्रप्रभा सोसायटी चौकाजवळ सिमेंट पाइपसाठी खोदलेला रस्ता बनविण्यात आला नसल्याने वाहन घसरून अपघात होत आहेत. पेट्रोल पंप ते इंद्रप्रभा चौक दरम्यान मुख्य महामार्ग व सेवा रस्ता यात मोठे अंतर असल्याने सुरक्षा उपाययोजना करण्याची गरज आहे.