शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूककोंडी होणार कमी

By admin | Updated: December 30, 2016 04:43 IST

हिंजवडी ते शिवाजीनगर या नव्या मेट्रो मार्गामुळे हिंजवडीतील वाहतुकीवरील ताण कमी होण्यास मदत होईल. तसेच पिंपरी, चिंचवड, वाकड, ताथवडे आणि थेरगावमधील

पिंपरी : हिंजवडी ते शिवाजीनगर या नव्या मेट्रो मार्गामुळे हिंजवडीतील वाहतुकीवरील ताण कमी होण्यास मदत होईल. तसेच पिंपरी, चिंचवड, वाकड, ताथवडे आणि थेरगावमधील नागरिकांना हिंजवडीमार्गे शिवाजीनगरला जाण्यासाठी एक जलद सेवेचा मार्ग उपलब्ध होऊ शकेल. हिंजवडी आयटी क्षेत्रातील कामगारांबरोबर परिसरातील नागरिकांना उत्तम दर्जाची दळणवळण सुविधा उपलब्ध होणार असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट आणि रामवाडी ते वनाज या दोन मेट्रो मार्गानंतर हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गाची नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली. हिंजवडी ते शिवाजीनगर या २३.५ किलोमीटर मेट्रो मार्गास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा कंदील दाखवला आहे. हिंजवडीतील राजीव गांधी आयटी पार्कमधील विविध कंपन्यांमध्ये सुमारे दोन लाख कामगार काम करतात. औद्योगिकीकरणास मिळेल आणखी चालना पिंपरी-चिंचवड ते शिवाजीनगर आणि हिंजवडी ते शिवाजीनगर हे दोन मेट्रो मार्ग औद्योगिकीकरणास चालना देण्यास उपयुक्त ठरणार आहेत. रस्त्यांचे जाळे हे शहराच्या विकासाच्या रक्तवाहिन्या मानल्या जातात. ज्या ठिकाणची दळणवळण यंत्रणा सक्षम, त्या ठिकाणी विकासाला अधिक चालना मिळत असते. पिंपरी-चिंचवड सध्या पुण्यापासून थोडे दूर वाटत असले, तरी मेट्रोसारख्या जलद वाहतूक प्रकल्पामुळे हे अंतर कमी होऊ शकेल. पुणे व पिंपरी-चिंचवडच्या एकत्रित विकासाचा सेतू म्हणून मेट्रो उपयुक्त ठरणार आहे. या परिसरात सुमारे दीड ते दोन लाख वाहनांची वर्दळ असते. हिंजवडी ते वाकड पूल या मार्गावर नेहमीच आयटी कंपन्या सुटतेवेळी वाहतूककोंडी होऊ लागली आहे. आयटी कंपन्यांची अभियंत्यांना ने- आण करण्याची व्यवस्था सक्षम नाही. त्यामुळे आयटी कंपन्यांमध्ये काम करणारे बहुतांशी कर्मचारी स्वत:च्या वाहनाने ये-जा करतात. त्यामध्ये चारचाकी वाहने वापरणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम नाही. त्यातच आयटी कंपन्यांची वाहन सुविधा अपुरी पडत असल्याने हिंजवडी आयटी पार्क परिसरात स्वत:ची वाहने घेऊन येणाऱ्या कर्मचाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. उत्तम दर्जाची वाहतूक सुविधा असल्यास स्वत:चे वाहन वापरण्याचे प्रमाण कमी होईल. पिंपरी ते शिवाजीनगर हा मेट्रो मार्ग पुणे-मुंबई महामार्गाने जाणार आहे. हा मार्ग निगडीपर्यंत नेण्यात यावा, अशी मागणी नागरिकांकडून होऊ लागली आहे. विनाअडथळा, जलद वाहतूक सेवा बीआरटीनंतर आणखी जलद वाहतूक सेवा देणारा मेट्रो मार्ग पिंपरी ते कृषी महाविद्यालय, शिवाजीनगरपर्यंत होणार आहे. रस्त्यापेक्षा किती तरी पट उंच पुलावरून मेट्रोचे ट्रॅक तयार केले जाणार आहेत. त्यामुळे बीआरटी आणि नेहमीच्या वाहतूक व्यवस्थेतील पुलांचा कसलाही अडथळा मेट्रोला येणार नाही. बीआरटी बसने अवघ्या २० मिनिटांत निगडी ते दापोडी अंतर कापणे शक्य होणार आहे.