शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

खेड तालुक्यातील पारंपरिक शेतीचा व्यवसाय कोलमडला, जमिनी वाचवण्यासाठी शेतकरी आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:09 IST

खेड तालुक्याला अनेक प्रकल्पांनी चोहोबाजूंनी घेरल्याने शेतीप्रधान असलेल्या या तालुक्यातील शेतजमीन विविध प्रकल्पांसाठी संपादित होत चालल्याने शेतकऱ्यांना देशोधडीला जाण्याची ...

खेड तालुक्याला अनेक प्रकल्पांनी चोहोबाजूंनी घेरल्याने शेतीप्रधान असलेल्या या तालुक्यातील शेतजमीन विविध प्रकल्पांसाठी संपादित होत चालल्याने शेतकऱ्यांना देशोधडीला जाण्याची वेळ आली आहे. सरकारी पडजमिनीवर प्रकल्प उभे न करता शेतकऱ्यांच्या पिकांच्या जमिनी संपादित होत असल्याने यातून आपली जमीन वाचवण्यासाठी शेतकरी जिवाची पर्वा न करता अजूनही आंदोलन करतो आहे.

एमआयडीसी प्रकल्पबाधित हताश -

चाकण औद्योगिक वसाहतीचे चार टप्पे पूर्ण झाले आहेत. यामध्ये तालुक्याच्या पूर्व, पश्चिम आणि दक्षिण भागातील गावांमधील हजारो हेक्टर जमिनीवर देशी विदेशी कंपन्या उभ्या राहिल्या आहेत. तर पाचव्या टप्प्यासाठी जमीन अधिग्रहण सुरू आहे. परंतु स्थानिक तरुणांना कंपन्यांमध्ये कुठल्याही प्रकारचा कायमस्वरूपी रोजगार आणि नोकरी आजपर्यंत मिळाली नाही. अनेक शेतकऱ्यांच्या जमीन परताव्याचे गोंधळ अजूनही सुरू आहे. शासन दरबारी हेलपाटे मारून थकले मात्र प्रश्न सुटले नाहीत.

तीन धरणे उशाला कोरड घशाला

खेड तालुक्याच्या पश्चिम भागात सह्याद्रीच्या कुशीतील पाण्यावर भामा आसखेड,चासकमान आणि कळमोडी सारखी मोठी धरणे आहेत.या प्रकल्पासाठी शासनाने अक्षरशः कवडीमोल किंमतीने शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या.प्रकल्प होऊन अनेक वर्षे लोटली, मात्र प्रकल्पबाधित अजूनही पुनर्वसन झाले नाही. त्यांना अजूनही आपल्या न्याय हक्कांसाठी आंदोलन करावे लागते आहे.

रिंग रोड आणि रेल्वेसाठी भूसंपादन

खेड तालुक्यातून रिंगरोड आणि रेल्वे या दोन प्रकल्पासाठी भूसंपादन करण्यात येणार आहे. यामुळे काही गावांमधील शेतकरी अक्षरशः पार कोलमडून पडणार आहे. या दोन्ही प्रकल्पामुळे खेड तालुक्याला काहीही फायदा होणार नाही.यामुळे बाधित शेतकऱ्यांनी या दोन्ही प्रकल्पाच्या विरोधातील आंदोलन तीव्र होत चालले आहे.

पुन्हा विमान लागले घिरट्या घालू

पुणे जिल्ह्यातील नियोजित विमानतळासाठी तीन जागांची पहाणी करुन माहिती गोळी केली जात आहे.विमानतळासाठी अद्यापही कोणतीही जागा निश्चित केलेली नाही.पुरंदर,चाकण,खेड या तीन जागांपैकी जी जागा तांत्रिकदृष्ट्या योग्य असेल त्या ठिकाणी विमानतळ करावे लागणार असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी वक्तव्य केल्याने खेड परिसरातील जागेचा विचार सुरु असल्याचे सुतोवाच मिळत आहेत.त्यामुळे तालुक्यात पुन्हा विमान घिरट्या घालू लागले आहे.

चाकण एमआयडीसी.