शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रेशनिंगचे धान्य अडत व्यापाऱ्याकडे सापडले

By admin | Updated: December 22, 2016 01:44 IST

सुपे (ता. बारामती) येथील उपबाजार समितीतील एका अडत व्यापाऱ्याकडे रेशनिंगचा गहू आणि तांदुळाची सुमारे ३१० कट्टे बुधवारी

सुपे : सुपे (ता. बारामती) येथील उपबाजार समितीतील एका अडत व्यापाऱ्याकडे रेशनिंगचा गहू आणि तांदुळाची सुमारे ३१० कट्टे बुधवारी (दि. २१) अवैध स्वरुपात असलेला साठा तालुका दक्षता समितीने उघडकीस आणला. यासंदर्भात नायब तहसीलदारांनी भेट दिली. येथील आठवडेबाजार असल्याने येथील उपबाजार समितीमध्ये भुसार मालाची खरेदी विक्री होत असते. यावेळी येथील आडत व्यापारी रमणलाल प्रेमचंद तेली यांच्या दुकानात रेशनिंग तांदळाचे ६० कट्टे तर गव्हाचे २५० कट्टे दक्षता समितीच्या सदस्या सुमिता भारत खोमणे, रोहिणी संजय चांदगुडे आणि बापुराव कोंडीबा भिसे यांना आढळुन आली. त्यांनी तातडीने तहसील विभागाला ही माहिती दिली. त्यानंतर बारामतीचे नायब तहसीलदार भोसले यांनी घटनास्थ्ळी भेट दिली. यावेळी सापडलेल्या सुमारे ३१० गहू व तांदळाच्या कट्ट्यांचा पंचनामा करण्याचे काम उशीरापर्यंत तलाठी आर. आर. जगदाळे यांचे सुरु होते. यावेळी जगदाळे यांनी ओम ट्रेडींग कंपनी कडुन काही कट्टे तसेच शेतकऱ्यांकडुन काही कट्टे माल आलेला आहे. यासंदर्भात तेली यांच्या दुकानातील पावत्या पुस्तके ताब्यात घेतल्याची माहिती जगदाळे यांनी दिली. दरम्यान बारामतीचे तहसीलदार हनुमंत पाटील यांच्या संपर्क साधला असता ते म्हणाले की, दुकानदाराकडे आलेला रेशनिंगचा माल हा थेट दुकानातुन आला आहे का? याची चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्यात येईल.(वार्ताहर)