शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

फिरायला गेलेले पर्यटक पैशाअभावी अडचणीत

By admin | Updated: November 10, 2016 02:14 IST

आपल्या आवडत्या ठिकाणी पर्यटनासाठी गेला आहात, तिथे मिळणाऱ्या छान वस्तू घ्यायच्या आहेत, खिशात पैसेही आहेत, पण त्या पैशाची किंमत बाजारामध्ये गेल्यावर शून्य आहे

पुणे : आपल्या आवडत्या ठिकाणी पर्यटनासाठी गेला आहात, तिथे मिळणाऱ्या छान वस्तू घ्यायच्या आहेत, खिशात पैसेही आहेत, पण त्या पैशाची किंमत बाजारामध्ये गेल्यावर शून्य आहे हे कळल्यावर काय भावना होईल? तशीच काहीशी अवस्था महाराष्ट्राबाहेर फिरायला गेलेल्या पर्यटकांची झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय चलनव्यवहारातून ५०० आणि १००० रुपयांच्या नोटाच रद्द केल्याने पर्यटकांसाठी पैसा एका क्षणात ‘खोटा’ ठरला आहे. त्यामुळे पर्यटकांना ‘नो खरेदी’ धोरण अवलंबून केवळ फिरण्याचा आनंद लुटावा लागत आहे. दिवाळीत किंवा त्यानंतर पर्यटनाला जाण्याचा एक टे्रंड गेल्या काही वर्षांमध्ये विकसित झाला आहे. पर्यटनाला कुठे जायचे, याचे नियोजन कुटुंबामध्ये दिवाळीपूर्वीच एकदोन महिने अगोदर केले जाते. मुलांच्या शाळा सुरू होण्यापूर्वी भारतातील विविध स्थळांना भेटी देण्यासाठी वैयक्तिक किंवा ट्रूर्स कंपन्यांबरोबर कुटुंबाची स्वारी निघते, यंदाही अगदी सिमला, कुलू-मनालीपासून अमृतसर, डलहौसी, धरमशाळा, राजस्थान, केरळ, दार्जिलिंग या ठिकाणी पर्यटनासाठी लोक गेलेले आहेत. मात्र, मोदींच्या या निर्णयामुळे पर्यटकांची चांगलीच गैरसोय झाली आहे. पर्यटनासाठी जाताना खिशात ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा घेऊन गेलेल्या पर्यटकांसाठी या नोटा एका झटक्यात ‘कागदी’ ठरल्या आहेत. बाजारात खरेदीसाठी गेल्यानंतर विक्रेते ५०० रुपयांच्या नोटा नाकारात आहेत, हॉटेलमध्ये जेवायला गेल्यावर तीच परिस्थिती अनुभवास मिळत आहे. करायचे तरी काय? असा प्रश्न पर्यटकांना पडला आहे. हैद्राबादला गेलेल्या एका प्रवाशाने आपला अनुभव कथन केला. या निर्णयानंतर दुकानात ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा स्वीकारणे बंद केले आणि एटीएमच्या बाहेर रांगा लागायला सुरूवात झाली. वाहतूक कंपन्यानीही ५०० रुपयांच्या नोटा घेणे नाकारले. खिशात १०० रुपायांच्या नोटा कमी असल्यामुळे आम्हाला जपून खर्च करावा लागत आहे. कार्डनेच पेमेंट करा, असा आग्रह दुकानदारांकडून होत आहेत. आमच्या काहीजणांच्या खात्यात एवढी रक्कम नाही. त्यामुळे जेवणासाठी एका हॉटेलवाल्याला पैसे गोळा करून देण्याची वेळ आल्याचे त्यांनी सांगितले.