भोर : ‘‘छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची शपथ घेतलेल्या तसेच महाराजांची कर्मभूमी असलेल्या रायरेश्वर किल्ल्याच्या पायथ्याशी होत असलेल्या शिवसृष्टीमुळे येथील पर्यटनाला चालना मिळणार आहे. त्यामुळे शिवसृष्टीच्या कामाला निधी कमी पडू देणार नाही,’’ असे आश्वासन आमदार संग्राम थोपटे यांनी दिले. धारांबे (रायरी) येथे सणसबाबा सेवाभावी संस्थेच्या अध्यात्मिक संस्कार शिबिराचा समारोप तसेच शिवसृष्टी सभागृहाचे भूमीपुजन थोपटे यांच्या हस्ते झाले. या वेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी काँगे्रसचे अध्यक्ष शैलेश सोनवणे, राजगडचे संचालक पोपटराव सुके, के. डी. सोनवणे, किसन शिनगारे, हनुमंत शिरवले, दिलीपराव बाठे, विठ्ठल आवाळे, नामदेवमहाराज किंद्रे, प्रवीण शिंदे, किसन दिघे, भाऊ पोळ, बबन पोळ, सुनील धुमाळ, रोहन बाठे, पुंडलीक भिलारे, रमेश पवार, बबन घोलप, पांडुरंग कुमकर, चंद्रकांत मरगजे, किसन किंद्रे, नावजी किंदे्र, चंदरबुवा किंद्रे, शंकर किंद्रे, सोपान कंक उपस्थित होते.थोपटे म्हणाले, छत्रपतींचे स्मरण व्हावे, त्यांचा आदर्श डोळ्यासमोर राहावा या उद्देशाने शिवसृष्टी साकारण्यात येत आहे. पर्यटनासाठी ही सुवर्णसंधी आहे. त्यामुळे या कामासाठी सर्वोतोपरी मदत करण्यात येईल. श्री सणसबाबा सेवाभावी संस्थेच्या वतीने धारांबे येथे २३ दिवसांचे मुक्कामी मोफत संस्कार शिबिर आयोजीत केले होते. यासाठी भोर, वेल्हे व खंडाळा तालुक्यातुन ८० विद्यार्थी सहभागी झाले होते.
शिवसृष्टीमुळे पर्यटनाला चालना मिळणार
By admin | Updated: June 8, 2015 04:51 IST