शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

मोसे खोऱ्यात वाढणार पर्यटन

By admin | Updated: June 2, 2017 01:53 IST

वरसगाव धरण परिसरातील दुर्गम भागातील रस्ते ताम्हिणी घाट तसेच कोकणाला जोडणार असल्याने या भागात पर्यटनाला

लोकमत न्यूज नेटवर्कपिरंगुट : वरसगाव धरण परिसरातील दुर्गम भागातील रस्ते ताम्हिणी घाट तसेच कोकणाला जोडणार असल्याने या भागात पर्यटनाला चालना मिळणार आहे. या परिसरातील रस्त्यांच्या विकासासाठी ९ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून या परिसरातील नागरिकांचा विकास यामुळे होणार आहे. यासाठी या भागातील पानशेत धरणमार्गे साई खुर्द, मोशे खुर्द व ताम्हिणी रस्त्याची सार्वजनिक बांधकाम पुणे विभागाचे अधीक्षक अभियंता राजेंद्र रहाणे यांनी नुकतीच पाहणी केली.देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून वरसगाव धरण परिसरातील रस्त्यांचा विकास हा रखडला आहे. यामुळे हा परिसर विकासापासून वंचित राहिला आहे. पावसाळ्यात अतिपर्जन्यमानामुळे या परिसराचा संपर्क तुटतो. यामुळे या परिसरातील ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होते. मात्र या परिसराच्या विकासासाठी वरसगाव धरण भागातील दुर्गम रस्ते ताम्हिणी घाटमार्गे कोकणाला जोडली जाणार आहेत. त्यामुळे सह्याद्रीच्या उंच डोंगररांगातील या परिसरात पर्यटनास चालना मिळणार आहे. त्यासाठी राज्य सरकारने या भागातील पानशेत धरणमार्गे साई खुर्द, मोशे खुर्द व ताम्हिणी रस्त्यासाठी नऊ कोटी रुपये मंजूर केलेले आहे. या रस्त्यामुळे ऐतिहासिक मोसे खोऱ्यातील तव (ता. मुळशी), गडले, साई खुर्द, सांडघर, धडवली आदी खेड्यातील मावळ्यांना पर्यटनामुळे रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. राज्य सरकारने चालू आर्थिक अंदाजपत्रकात खास बाब म्हणून या निधीस मंजुरी दिली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे पुणे विभागाचे अधीक्षक अभियंता राजेंद्र राहणे यांनी वरसगाव धरणाच्या डाव्या तीरावरील माथ्यापासून सुरू होणाऱ्या या रस्त्याची साई खुर्दमार्गे थेट तव गाव (ता. मुळशी) पर्यंत पाहणी केली. कार्यकारी अभियंता धनंजय देशपांडे, मुळशी विभागाचे उपविभागीय अभियंता अनिल शिंदे तसेच शाखा अभियंता धनराज दराडे, यांच्यासह तव गावच्या सरपंच पल्लवी लालासाहेब पासलकर, तवचे सामाजिक कार्यकर्ते लालासाहेब पासलकर व आदींसह स्थानिक नागरिक पाहणी दौऱ्यात सहभागी झाले होते. उपविभागीय अभियंता अनिल शिंदे म्हणाले पानशेतजवळील साई खुर्दमार्गे तव गाव ते ताम्हिणी घाट असा हा ५७ किमीचा रस्ता आहे. राज्य सरकारने चालू आर्थिक अंदाजपत्रकात त्यासाठी नऊ कोटी रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे. त्यामध्ये पानशेत धरणमार्गे साईव खुर्द सांडवघर, मोसे खुर्द, धडवली ते तवगाव अशा मार्गे हा रस्ता असेल व कालांतराने तवगाव ते वडवली, साघरी, गडले, धामणओळ, मुगाव मार्गे ताम्हिणीला जोडणार आहे.रस्त्याच्या नियोजित कामांची कार्यवाही सुरू आहे. पहिल्या टप्प्यात कामांचे अंदाजपत्रक तयार केले जाणार आहे. निविदा मंजूर झाल्यावर पावसाळ्यानंतरच प्रत्यक्ष रस्त्याच्या कामाची सुरुवात केली जाणार आहे. वरसगाव धरणाच्या डाव्या तीरावरील उंच डोंगरावर असलेल्या तव, मोसे खुर्द, सांडवघर आदी दुर्गम भागातील खेडोपाडी गावांमध्ये जाण्यासाठी पक्का डांबरी रस्ता नाही. त्यामुळे येथील नागरिकांची पावसाळ्यात मोठी गैरसोय होते. वरसगाव धरणाच्या उजव्या तीरावरील दासवे येथे आलिशान लवासा हा प्रकल्प आहे. त्यामुळे या परिसरातील रस्त्यांचा विकास झाला आहे.