शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका हद्दीत समाविष्ट गावांमध्ये होणार रस्ते, प्रत्येक गावाला १ कोटी ७३ लाख रुपयांचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2018 02:40 IST

न्यायालयाच्या आदेशामुळे महापालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या ११ गावांची परवड थांबण्याची शक्यता अखेर निर्माण झाली आहे.

पुणे : न्यायालयाच्या आदेशामुळे महापालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या ११ गावांची परवड थांबण्याची शक्यता अखेर निर्माण झाली आहे. या गावांमधील प्रमुख रस्त्यांची कामे महापालिकेच्या वतीने करण्यात येणार असून, लवकरच त्याची निविदा प्रसिद्ध होणार आहे. प्रत्येक गावासाठी १ कोटी ७३ लाख रुपयांचा निधी फक्त रस्त्यांच्या कामांना म्हणून मंजूर करण्यात आला आहे.पथ विभागाचे प्रमुख अभियंता अनिरुद्ध पावसकर यांनी ही माहिती दिली. या ११ गावांमधील प्रमुख रस्त्यांच्या कामांना महापालिका प्रशासनाने प्राधान्य दिले आहे.रस्तेही निश्चित करण्यात आलेअसून, त्यांचे खर्चाचे अंदाजपत्रकही तयार करण्यात आले आहे.येत्या तीन आठवड्यांत या कामांच्या निविदा जाहीर होतील, असे पावसकर यांनी सांगितले. शिवणे, उत्तमनगर, धायरी, आंबेगाव खुर्द, आंबेगाव बुद्रुक, लोहगाव, फुरसुंगी, उरुळी देवाची, मुंढवा, साडेसतरानळी, उंड्री अशा ११ गावांतील मुख्य रस्त्यांची कामे करण्यात येणार आहे.महापालिकेत समावेश होतात तेथील ग्रामपंचायती त्वरित विसर्जित करण्यात आल्या. मात्र, त्यामुळे ग्रामपंचायत नाही व महापालिका तिथे काही काम करायला तयार नाही अशी या गावांची स्थिती झाली. स्थानिक पदाधिकाऱ्यांसमवेत महापालिका प्रशासनाच्या तीन-चार बैठका झाल्या, त्यातही गावांमध्ये विकासकामे व्हावीत, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. न्यायालयाच्या आदेशाने सरकारने गावांचा समावेश तर केला, मात्र तेथील कामांसाठी महापालिकेला काहीही निधी दिला नाही, निधी नसल्यामुळे महापालिकेलाही तिथे काही काम करता येईनासे झाले.तिढा सुटणार कसा : नागरीककरण झाले पण समस्या कायमबहुसंख्य गावांचे आधीच नागरीकरण झाले आहे. त्या तुलनेत सुविधा मात्र काहीही नाहीत. सर्वच गावांमधील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. शिवणे-उत्तमनगर परिसरातील मुख्य एनडीए रस्त्याचेही काम करण्यात येणार आहे. अखेरीस स्थायी समितीचे तत्कालीन अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी या गावांच्या विकासासाठी म्हणून सन २०१८-१९ च्या अंदाजपत्रकात १०० कोटी रुपयांची तरतूद केली. त्यातील काही निधी आता महापालिकेकडून रस्त्यांच्या कामासाठी म्हणून वापरण्यात येणार आहे.सर्व गावांमधील प्रत्यक्ष पाहणीनंतर काही रस्ते निश्चित करण्यात आले आहेत, अशी माहिती पावसकर यांनी दिली. हे रस्ते गावातील प्रमुख रस्ते आहेत. त्यावरून वाहतूक होत असते. त्या तुलनेत त्यांचे काम यापूर्वी व्यवस्थित होत नव्हते, आता मात्र महापालिकेच्या पद्धतीने ते रस्ते तयार करण्यात येणार आहेत, असे पावसकर म्हणाले.

टॅग्स :Pune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाnewsबातम्या