पुरंदर तालुक्यात ६८ ग्रामपंचायतीच्या निवडणूक प्रक्रिया सुरु असून दिनांक ३० तारखेपर्यंत एकूण १ हजार १६२ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. दिनांक ३० म्हणजे उमेदवारी अर्ज भरण्याचे शेवटच्या दिवशी ८०० अर्ज दाखल झाले आहेत.
गावनिहाय अर्जाची संख्या पुढील प्रमाणे आहे :- आस्करवाडी २०, तोंडल २५, कोडीत खुर्द १६, सोमुर्डी २१, थापे वारवडी २१, पानवडी ७, लपतळवाडी ८, टेकवडी २७, मावडी सुपे १४, झेंडेवाडी १४, पिसे १५, खानवडी ७, पिसुर्ती ३२, कुंभारवळण १९, नाझरे सुपे १०, तक्रारवाडी ७, वाळुंज २९, हरगुडे २५, देवडी ७, राजेवाडी २०, पोंढे १६, आंबोडी १४, रिसे २२, पिंगोरी २५, दौण्डज ३०, सटलवाडी १९, हरणी २६, भिवरी १५, मावडी क प २७, मांढर १७, बोपगाव ९, पूर पोखर २०, वाघापूर ३६, नायगाव ९, साकुर्डे ३६, राख २०, पांडेश्वर ११, जेऊर ३४, केतकावळे २३, हिवरे ३५, शिवरी ११, जवळार्जुन ४२, माहूर २४, धालेवाडी २०, नाझरे क प ३९, गु-होळी २०, पारगाव २४, आंबळे २८, काळदरी २५, सोनोरी २६, सुपे खुर्द २४, पिंपरे खुर्द २६, परिंचे ३०, कोडीत बु २९, पिसर्वे २५, गराडे ५५, चांबळी ३०, मांडकी ३७, कोळविहीरे ३०, खळद ३५, बेलसर ३८, भिवडी ३४, दिवे ५१, निरा शिवतक्रार ८८, निळुंज १०, पिंपळे २५, पिंपरी ३० आणि बो-हाळवाडी १८. यापैकी भिवरी, नायगाव, खानवडी, बोपगाव, पानवडी आणि देवडी या ६ ग्रामपंचायती बोनविरोध झाल्याचे समजते.