शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

‘पुणे प्रॉपर्टी शोेकेस’चे आज उद्घाटन

By admin | Updated: March 25, 2017 04:10 IST

पुण्यातील घराचे स्वप्न साकार करण्यासाठी विविध पर्याय मिळावेत, यासाठी ‘लोकमत’च्या वतीने ‘पुणे प्रॉपर्टी शोकेस’ या गृहप्रदर्शनाचे आयोजन

पुणे : पुण्यातील घराचे स्वप्न साकार करण्यासाठी विविध पर्याय मिळावेत, यासाठी ‘लोकमत’च्या वतीने ‘पुणे प्रॉपर्टी शोकेस’ या गृहप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारपासून (दि. २५ मार्च) या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. गणेश कला क्रीडा मंच येथे भरणाऱ्या या भव्य गृहप्रदर्शनाचे उद्घाटन सकाळी १० वाजता गार्डियन कॉर्पोरेशनचे संचालक उदय जाधव यांच्या हस्ते होणार आहे़ या वेळी बँक आॅफ महाराष्ट्रचे सरव्यवस्थापक राजकिरण भोईर यांची प्रमुख उपस्थिती आहे.गेल्या पाच वर्षांपासून ‘लोकमत’‘पुणे प्रॉपर्टी शोकेस’ या नावाने पुण्यातील नामांकित व प्रथितयश बांधकाम व्यावसायिकांच्या प्रदर्शनाचे आयोजन करीत आहे. हजारो पुणेकरांचे घराचे स्वप्न या प्रदर्शनाच्या माध्यमातून पूर्ण झाले आहे. यंदाचे या उपक्रमाचे हे यशस्वी सहावे वर्ष असून, यामध्ये पुण्यातील नामांकित बांधकाम व्यावसायिकांचे १५0 हून अधिक गृहप्रकल्प पाहता येणार आहेत. या गृहप्रदर्शनात अफोर्डेबल होम्स, लक्झुरियस होम्स, व्यावसायिक प्रकल्प, बंगलो प्लॉट्स, ओपन प्लॉट्स असे प्रॉपर्टीमधील गुंतवणुकीसाठीचे अनेक पर्याय या वेळी पुणेकरांना पाहता येणार आहेत़पुणे, पिंपरी-चिंचवड व संपूर्ण पुणे जिल्ह्यातील अनेक प्रकल्पांची माहिती एकाच छताखाली मिळणार असल्यामुळे या प्रदर्शनामध्ये वेळेची व पैशाची बचत होणार आहे़ आपल्या स्वप्नातील व आपल्या गरजेप्रमाणे हवे असणारे मनपसंत घर येथे इच्छुक ग्राहकांना पाहता येणार आहे़ या प्रदर्शनासाठी बांधकाम व्यावसायिकांनी अनेक वैशिष्ट्यपूर्ण व आकर्षक योजना आखल्या आहेत़ त्यांचाही लाभ या प्रदर्शनात भेट देणाऱ्यांना मिळणार आहे़ गेल्या ५ वर्षांमध्ये पुण्यातील अनेक इच्छुकांनी आपले पुण्यातील घर नक्की करत, हे प्रदर्शन यशस्वी बनविण्यास मदत केली आहे़ पुण्यातील गृहप्रकल्पांची सखोल व सविस्तर माहिती मिळण्याची संधी शनिवार, दि़ २५ व रविवार, दि़ २६ मार्च २०१७ रोजी असून, इच्छुक नागरिकांनी या भव्य प्रदर्शनाला भेट देऊन आपल्या गृहस्वप्नांची पूर्तता करावी, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे़ या प्रदर्शनास बँकिंग पार्टनर बँक आॅफ महाराष्ट्र आहे. आउटडोअर पार्टनर सुरेखा कम्युनिकेशन आहे.