शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

महात्मा फुले साहित्य संमेलनाचे आज उद्घाटन

By admin | Updated: November 26, 2014 23:29 IST

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे सातवे राज्यस्तरीय महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलन खानवडी (ता. पुरंदर) येथे गुरुवारी (दि. 27) महात्मा फुले यांच्या मूळगावी होत आहे.

खळद : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे सातवे राज्यस्तरीय महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलन खानवडी (ता. पुरंदर) येथे गुरुवारी  (दि. 27) महात्मा फुले यांच्या मूळगावी होत आहे. या संमेलनाचे उद्घाटन समाजवादी नेते भाई वैद्य यांच्या हस्ते होणार आहे.  अध्यक्षस्थानी डॉ. सय्यद जब्बार पटेल असतील. तर पोपटराव कटके स्वागताध्यक्ष आहेत. 
सकाळी 9 वाजता सरपंच चंद्रकांत फुले यांच्या हस्ते साहित्य ज्योत व ग्रंथ दिंडी मिरवणुकीची सुरुवात होणार आहे. अकरा वाजता उद्घाटन व पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. 
दुपारी 2 वाजता ‘मी जोतिराव फुले बोलतोय’ हा सिद्धार्थ मोरे व सुप्रिया मोरे यांचा कार्यक्रम होणार आहे. तीन वाजता महात्मा फुले यांचे सामाजिक विचार हा परिसंवाद होणार असून, दशरथ यादव, संदीप तापकीर, शेलेंद्र बेल्हेकर मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर अरुण गिरी यांच्या अध्यक्षतेखाली कथाकथन होणार असून, यात जया रसाळ व माधव पाटील सहभाग घेणार आहेत.  
सायंकाळी डॉ. दिगंबर दुर्गाडे, फुलचंद नागटिळक यांच्या अध्यक्षतेखाली कवीसंमेलन होणार आहे. साहित्य परिषदेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष शरद गोरे,  सरचिटणीस दशरथ यादव, उपाध्यक्ष राजकुमार काळभोर, दत्ता भोंगळे, राजाभाऊ जगताप, नंदकुमार दिवसे, चंद्रकांत फुले, रवींद्र फुले, चंद्रकात टिळेकर, सुनील धिवार, सुजाता गुरव, रामभाऊ गिरमे, गंगाराम जाधव, दत्ता होले आदींनी संयोजन केले आहे. (वार्ताहर)