शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मोटारचालक महिलेच्या जामिनाचा आज निर्णय

By admin | Updated: April 27, 2017 05:13 IST

बाणेर येथील अपघातात माय-लेकींच्या मृत्यूस कारण ठरल्याच्या प्रकरणात मोटारचालक महिलेचा जामिन अर्ज रद्द करावा, अशी मागणी

पुणे : बाणेर येथील अपघातात माय-लेकींच्या मृत्यूस कारण ठरल्याच्या प्रकरणात मोटारचालक महिलेचा जामिन अर्ज रद्द करावा, अशी मागणी सरकारपक्षाने केली होती. त्या अर्जाबाबत बचाव पक्षाने व सरकारपक्षाने आपला युक्तिवाद बुधवारी केला. त्यावर न्यायालय उद्या (गुरुवारी) निकाल देणार आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी समता चौधरी यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. सुजाता जयप्रकाश श्रॉफ (रा.आपटे रस्ता, शिवाजीनगर) असे मोटारचालक महिलेचे नाव आहे. १७ एप्रिल रोजी दुपारी ३च्या सुमारास रस्ता ओलांडण्यासाठी दुभाजकावर उभ्या असलेल्या पाच जणांना मोटारीने धडक दिली होती. त्यामध्ये माय-लेकीच्या मृत्यू झाला. या प्रकरणी श्रॉफ यांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्यावर भारतीय दंड संहिता कलम ३०४ (अ) (निष्काळजीपणे वाहन चालवून मृत्यूस कारण होणे) कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. हे कलम जामिन पात्र असल्यामुळे अवघ्या काही तासात सुजाता यांना जामिन मिळाला. त्यामुळे या प्रकरणात ३०४ (सदोष मनुष्यवध) कलम लावण्याचा अर्ज पोलिसांनी न्यायालयात केला आहे. बचाव पक्षातर्फे हर्षद निंबाळकर यांनी न्यायालयात बाजू मांडताना सांगितले की, ३०४ हे कलम लावले तरी एकदा दिलेला जामिन रद्द करता येत नाही. कलम ४६३ च्या तरतुदीनुसार जामिन दिला असल्याने सरकार पक्षाला सत्र किंवा उच्च न्यायालयात अर्ज करावा लागेल.निंबाळकर यांनी युक्तिवाद करताना नमूद केले की, जामिन फेटाळण्यासाठी परिस्थिती असावी लागते. ३०४ कलम लावण्यासाठी आरोपीने मद्यप्राशन करणे किंवा विनापरवाना वाहन चालविणे असे काही कारण असावे लागते. दरम्यान, या अपघाताचा तपास करण्यासाठी श्रॉफ यांना पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली.