शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

शिवसृष्टीवर आज तोडगा, पालकमंत्र्यांचा पुढाकार; महामेट्रोचे अधिकारीही उपस्थित राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 00:53 IST

महामेट्रोच्या नियोजित स्थानकामुळे अडलेल्या प्रस्तावित शिवसृष्टीवर तोडगा काढण्यासाठी मंगळवारी मुंबईत बैठक होत आहे. पालकमंत्री गिरीश बापट यांच्या पुढाकारामुळे ही बैठक होत असून नगरविकास खात्याचे प्रधान सचिव नितीन करीर हेही बैठकीला उपस्थित असतील.

पुणे : महामेट्रोच्या नियोजित स्थानकामुळे अडलेल्या प्रस्तावित शिवसृष्टीवर तोडगा काढण्यासाठी मंगळवारी मुंबईत बैठक होत आहे. पालकमंत्री गिरीश बापट यांच्या पुढाकारामुळे ही बैठक होत असून नगरविकास खात्याचे प्रधान सचिव नितीन करीर हेही बैठकीला उपस्थित असतील. त्यामुळे यावर तिथे काही निर्णय होण्याचीही शक्यता आहे.महापौर मुक्ता टिळक, स्थायी समिती सभापती मुरलीधर मोहोळ, सभागृहनेते श्रीनाथ भिमाले, विरोधी पक्षनेते चेतन तुपे, कोथरूडमधील नगरसेवक व शिवसृष्टीसाठी अगदी सुरुवातीपासून आग्रही असलेले दीपक मानकर यांनाही बैठकीसाठी बोलावण्यात आले आहे. विशेष म्हणजे महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित व अन्य काही अधिकारीही बैठकीला उपस्थित असतील. त्यामुळेच या बैठकीविषयी शिवप्रेमींमध्ये उत्सुकता आहे.मेट्रोच्या कोथरूड येथील नियोजित स्थानकाच्या जागेवर आधी शिवसृष्टी प्रस्तावित करण्यात आली होती. तसा ठराव मानकर यांनी ते उपमहापौर असताना मंजूर करून घेतला होता. त्यासाठी प्रख्यात कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी डिझाईनही तयार केले आहे. मात्र नंतर त्याच जागेवर मेट्रोचे स्थानक निश्चित करण्यात आले व शिवसृष्टी मागे पडली. मेट्रोचे डिझाईन करणाºया दिल्ली मेट्रो कॉर्पोरेशननेही एक तर मेट्रोचे स्थानक किंवा शिवसृष्टी असे स्पष्ट करीत महापालिकेने यावर निर्णय घ्यावा, असे सांगितले.>ठोस निर्णयाची अपेक्षातत्कालीन पदाधिकाºयांनी या विषयाकडे दुर्लक्ष केले व शिवसृष्टीचा विषय तसाच राहिला. दरम्यानच्या काळात मानकर यांनी त्याच जागेवर मेट्रो स्थानकही व शिवसृष्टीही असे डिझाईन करून घेतले व शिवसृष्टीचा आग्रह कायम ठेवला. मध्यंतरी याच विषयावर त्यांनी पदाधिकाºयांना खास सभाही आयोजित करायला लावली. त्यानंतर आता पुन्हा या विषयाला पालकमंत्री बापट यांच्यामुळे गती आली आहे. महामेट्रोचे दीक्षित यांनीही दोन्ही गोष्टी होऊ शकतात, म्हणून अनुकूलता दर्शविली आहे.