शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

भीमा नदीमध्ये आज पाणी सोडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 01:17 IST

शिरूर व हवेली तालुक्यात भीमा नदीकाठावरील गावात तीव्र पाणीटंचाई झाली होती.

लोणीकंद : शिरूर व हवेली तालुक्यात भीमा नदीकाठावरील गावात तीव्र पाणीटंचाई झाली होती. तसेच, कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यातील पाणीसाठा संपल्याने नागरिकांच्या पाण्याच्या मागणीबाबत पालकमंत्र्यांकडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून, भीमा नदीवरील बंधारे भरण्यासाठी भामा आसखेड धरणातून पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती आमदार बाबूराव पाचर्णे यांनी दिली.या निर्णयामुळे हवेली-शिरूर तालुक्यात नागरिकांनी समाधान व्यक्त केले. आमदार पाचर्णे म्हणाले, ‘भीमा नदीकाठच्या बहुतांश गावांच्या पाणी योजना, तसेच जवळच्या गावांच्याही पिण्याच्या पाण्याच्या योजना कोल्हापूर बंधाऱ्यावर अवलंबून असल्याने पाण्याअभावी योजना बंद पडण्याची शक्यता असल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे. पाण्याअभावी उभी पिके ही जळून जाण्याची भीती असल्याने भीमा नदीत त्वरित पाणी सोडण्याची मागणी नदीकाठच्या गावांतील ग्रामस्थांनी केली आहे.’ भामा आसखेड धरणातील पाणीसाठ्यातून पाणी सोडल्यास खेड, हवेली, शिरूर व दौंड तालुक्यांतील शेतकऱ्यांना फायदा होईल, यासाठी आमदार पाचर्णे यांनी पाणी सोडण्याबाबत पालक मंत्र्यांकडे केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश कुटे, जिल्हा नियोजन समिती सदस्य दादासाहेब सातव, संजय सातव पाटील, संदीप भोंडवे, आदीनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.> सर्वसामान्य नागरिक व शेतकरी यांची गरज लक्षात घेऊन आज पालकमंत्री गिरीश बापट यांनी अधीक्षक अभियंता चोपडे यांना पाणी सोडण्याचे आदेश दिले असून उदयापासून (सोमवार) पाणी सोडण्यात येणार आहे.- बाबूराव पाचर्णे, आमदार