शहरं
Join us  
Trending Stories
1
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
2
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
3
तिच्यासोबतच लग्न करायचंय! तरुणाचं शोलेस्टाईल आंदोलन, पण प्रेयसीचं सत्य समजताच पायाखालची वाळू सरकली
4
'ऑपरेशन सिंदूर' नंतर भारताची पहिल्यांदाच पाकिस्तानला मदत! दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांनी एकमेकांशी संपर्क साधला
5
Gold Silver Price 25 August: सोन्याच्या दरात बंपर तेजी, एका दिवसात चांदी २६२७ रुपयांनी महागली; पाहा काय आहेत नवे दर?
6
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? अमित शाह म्हणाले, 'जास्त ताणून काहीतरी...'
7
'तुमच्या यूट्यूब चॅनेल्सवर माफी मागा', दिव्यांगांची खिल्ली उडवल्याप्रकरणी SC चे समय रैनासह ५ जणांना आदेश
8
काय आहे 'सलवा जुडूम' ?; ज्यावरून अमित शाहांनी विरोधकांच्या उपराष्ट्रपतिपदाच्या उमेदवाराला घेरले
9
जाऊ डबलसीट रे लांब लांब... पण हे असं?; 'लव्ह बर्ड्स'चा आणखी एक Video तुफान व्हायरल
10
आता फक्त ३ मिनिटांत भरा ITR! 'या' कंपनीने लॉन्च देशातील पहिला AI प्लॅटफॉर्म; अंतिम मुदतही वाढली
11
Nikki Murder Case : "दोन्ही जावई मुलींच्या पार्लरमधून पैसे चोरायचे, काहीच काम करत नव्हते"; ढसाढसा रडले वडील
12
AI ची कमाल, आता म्हातारपणही रोखणार, राहाल "चिरतरुण"! काय आहे चॅटबॉट रिव्हर्स एजिंग? जाणून घ्या
13
Ola Electric Share Price: ओला इलेक्ट्रिकच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी; नीति आयोगाच्या वृत्ताचा परिणाम, तुमच्याकडे आहे का?
14
गणेश चतुर्थी २०२५: राहु काळ कधी? ‘या’ शुभ मुहूर्तावर स्थापन करा गणपती; पाहा, चंद्रास्त वेळ
15
Pune: सिंहगडावरून बेपत्ता झालेला गौतम गायकवाड पाच दिवसांनी सापडला; कुठे होता, पोलिसांनी काय सांगितलं?
16
"मी कुणाच्या वाट्याला जात नाही आणि..." अजित पवारांनी घेतली संकर्षण कऱ्हाडेची फिरकी
17
अमेरिका ७, चीन ४, भारत १.., ही कोणती यादी, जिथे फक्त दोनच दिग्गजांचं आहे वर्चस्व; यातून काय मिळताहेत संकेत?
18
लहान गुंतवणुकीतून कोट्यधीश होण्यासाठी SIP का आहे बेस्ट? 'हे' ८ मुद्दे ठरतात गेमचेंजर
19
गर्लफ्रेंडशी शरीरसंबंध प्रस्थापित करताना पुरूषाचा मृत्यू, कोर्टाने प्रेमिकेला ठोठवला दंड
20
वराह म्हणजे डुक्कर नाही, तर ते यज्ञरूप आहे; वराह जयंतीनिमित्त जाणून घ्या विष्णूंचे अवतारकार्य

आनंद सोहळ्याची आज सांगता

By admin | Updated: September 15, 2016 01:53 IST

गणेशोत्सवामध्ये विविध देखाव्यांच्या माध्यमातून समाजप्रबोधन व देशभक्तीचा गजर करणारी अनेक मंडळे विसर्जन मिरवणुकीतही जनजागरण करणार आहे

पुणे : गणेशोत्सवामध्ये विविध देखाव्यांच्या माध्यमातून समाजप्रबोधन व देशभक्तीचा गजर करणारी अनेक मंडळे विसर्जन मिरवणुकीतही जनजागरण करणार आहेत. ढोल-ताशांच्या गजराबरोबरच मिरवणुकीत प्रबोधनाचा जागर होणार आहे. काही सामाजिक व शैक्षणिक संस्था-संघटनांकडूनही मिरवणुकीत विविध विषयांवर प्रबोधन केले जाणार आहे. तर काही मंडळांनी ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी मिरवणुकीत स्पीकर न लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गुरुवारी निघणाऱ्या वैभवशाली मिरवणुकीचे वैभव आणखी वाढणार आहे.मागील काही वर्षांपासून शहरासह उपनगरांतील अनेक सार्वजनिक गणेश मंडळांकडून समाजप्रबोधन तसेच देशभक्तिपर देखाव्यांवर भर दिला जात आहे. याला गणेशभक्तांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे. यंदाचा गणेशोत्सवही याला अपवाद ठरला नाही. किंबहुना या वर्षी जिवंत व हलत्या देखाव्यांच्या माध्यमातून विविध सामाजिक विषय हाताळणाऱ्या मंडळांची संख्या वाढल्याचे प्रकर्षाने जाणवले. आता विसर्जन मिरवणुकीतही देशभक्तीसह सामाजिक विषयांवर भाष्य करणारे रथ, पथके सहभागी होणार आहेत. अनेक मंडळांनी त्यासाठी जय्यत तयारी केली असून, गुरुवारच्या मिरवणुकीत ढोल-ताशाच्या गजराबरोबरच प्रबोधनाचा जागरही होणार आहे. काही मंडळांनी पौराणिक, ऐतिहासिक रथ, फुलांचे देखावे, स्पीकरच्या भिंती न करता समाजप्रबोधनाची कास धरली आहे. त्याला काही सामाजिक, शैक्षणिक संस्थांचीही जोड मिळणार आहे. स्त्रीभ्रूणहत्या, बाल लैंगिक अत्याचार, अवयवदान, ध्वनिप्रदूषण, स्वच्छता, जवानांचे बलिदान, पर्यावरणाचे रक्षण, पाणी बचत अशा विविधांवर मिरवणुकीत प्रकाश टाकला जाणार आहे. मुख्य मिरवणुकीच्या लक्ष्मी रस्त्यासह इतर प्रमुख रस्ते व उपनगरांतील मिरवणुकांमध्येही ठिकठिकाणी हे चित्र पाहायला मिळणार आहे. लोकमान्य टिळकांची ’स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच! या घोषणेची शताब्दी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी जयंती यांचे औचित्य साधणारा देखावा त्वष्टा कासार मंडळाने साकारला आहे. चित्ररथामध्ये चित्रफलकावर अखंड भारताचा नकाशा, देशातील सामाजिक विषयाची चळवळ जागृत ठेवणारी प्रतिके, स्वदेशीअंतर्गत महात्मा व चरखा, साक्षरता-सावित्रीबाई व महात्मा फुले, व्यवसनमुक्ती- नरेंद्र दाभोळकर, बेटी बचाओ-आॅलंपिंक पदक विजेत्या रूपेरी सिंधू व शक्तीशाली साक्षी, जलसंवर्धन-राजेंद्रप्रसाद व पुण्यातील गणेशमंडळांनी खडकवासला धरणाचा गाळा काढण्याचा उपक्रम यांचा समावेश करण्यात आला आहे. स्त्रीभ्रूणहत्या, अवयवदानाचा जागरसाखळीपीर तालीम मंडळाने या वर्षीच्या मिरवणुकीत मोठा रथ न करता कार्यकर्त्यांच्या डोक्यावरून गणपतीची मिरवणूक काढण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी ढोल-ताशा पथकांना टाळत वारकरी दिंडीचा समावेश केला जाणार आहे. या दिंडीच्या माध्यमातून प्रदूषणमुक्तीचा संदेश दिला जाणार आहे. तर लायन्स क्लबच्या सहकार्याने मिरवणुकीत विविध सामाजिक संदेश लिहिलेले टी-शर्ट घालून कार्यकर्ते सहभागी होणार आहे. त्यावर स्त्रीभ्रूणहत्या, बेटी बचाओ, शहीद जवानांना अभिवादन, पोलीस रस्त्यावर म्हणून आपण सुरक्षित असे विविध विषयांवरील संदेश असणार आहेत. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या व्यक्तिमत्त्वविकास केंद्रामार्फत मानाच्या पहिल्या कसबा गणपतीच्या मिरवणुकीत व्यसनाधीनता, लैंंगिक अत्याचार, आत्महत्या अशा विविध विषयांवर पथनाट्य, मूकनाट्य अशा विविध प्रकारे प्रबोधन केले जाणार आहे. या केंद्राच्या पुढाकाराने शहरातील विविध संस्थांमधील सुमारे १०० समुपदेशकांचे पथक मिरवणुकीत सहभागी होणार आहे. युवक-युवतींच्या वर्तन समस्या, व्यसनाधीनता, क्षुल्लक कारणांवरून होणाऱ्या आत्महत्यांचे वाढते प्रमाण, लैंगिक अत्याचार अशा ज्वलंत विषयांवर लक्ष वेधले जाणार आहे. व्यक्तिमत्त्वविकास केंद्राचे पथक ‘मोबाईल फोन तसेच टीव्हीची आसक्ती’ आणि ‘वाढते घटस्फोट’ या संकल्पनेवर आधारित सादरीकरण करणार आहे. बाया कर्वे स्त्री अभ्यास केंद्राचे पथक ‘लैंगिक अत्याचाराच्या विरोधात महिलांचे सबलीकरण’ या विषयावर, आस्था काउंसिलिंग सेंटर ‘संगीत उपचार’, प्रिझम फाउंडेशनमार्फत ‘विशेष गरजा असणाऱ्या मुलांसाठी समुपदेशन’ तर व्यक्तिमत्त्वविकास प्रबोधिनीचे पथक ‘करिअर काउन्सेलिंग’ आणि हास्ययोग उपचार’ या विषयावर सादरीकरण करणार आहेत, अशी माहिती मएसोचे मुख्य कार्यकारी अधिकारी जगदीश मालखरे यांनी दिली. ध्वनिप्रदूषणाला आवर ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी शुक्रवार पेठेतील चिंचेची तालीम मंडळाने मिरवणुकीत स्पीकर न लावण्याचा निर्णय घेतला आहे. स्पीकरसाठी होणाऱ्या खर्चातून मंडळाने २५० ते ३०० किलो धान्य घेऊन सफाई कामगारांना वाटप केले आहे. मिरवणुकीत फुलांनी सजवलेली मेघडंबरी असलेल्या रथाचा समावेश असला तरी त्यावर स्पीकर लावला जाणार नाही.