शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
4
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
5
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
6
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
7
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
8
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
9
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
10
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
11
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
12
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
13
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
14
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
15
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
16
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
17
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
18
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
19
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
20
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

तरुणांमध्ये वाढतेय तंबाखू सेवनाचे प्रमाण

By admin | Updated: May 31, 2017 01:36 IST

आज रस्त्याने जाता-येता तरुण मुले-मुली अगदी स्टाईलमध्ये सिगरेट ओढताना दिसतात. जागतिक आरोग्य संघटनेने ३१ मे हा दिवस ‘तंबाखू

गोरख माझिरे/लोकमत न्यूज नेटवर्कभूगाव : आज रस्त्याने जाता-येता तरुण मुले-मुली अगदी स्टाईलमध्ये सिगरेट ओढताना दिसतात. जागतिक आरोग्य संघटनेने ३१ मे हा दिवस ‘तंबाखू सेवन विरोधी दिन’ जनजागृती निर्माण करण्यासाठी म्हणून घोषित केला असला तरी, तंबाखू, गुटखा आणि सिगरेट यांचे सेवन आणि विक्रीचे प्रमाण ‘जैसे थे’च आहे. व्यसनमुक्तीसाठी गुटखाविक्रीवर बंदी असूनही बाजारात सर्रास याची विक्री होताना दिसून येते.ग्रामीण भागात सिगरेटपेक्षा गुटखा, तंबाखू यांचे प्रमाण अधिक आहे. विशेषत: तरुण मुला-मुलींमध्ये धूम्रपानाचे प्रमाण वाढत आहे. स्त्रियांमध्येही तंबाखू जाळून त्याची मिसरी करून दातांना आणि हिरड्यांना लावली जाते. तंबाखूमुळे मृत्यूमुखी पडणाऱ्या व्यक्तीमुळे अनेक कुटुंबे उघड्यावर पडतात.तंबाखू सेवनाने हृदय, फुप्फुस, अन्ननलिका, किडनी, आतडे, यकृतासारख्या मुख्य अवयवांवर वाईट परिणाम होणारे रोग उद्भवतात. या प्रकाराचे धोके लक्षात घेऊन सर्वांनीच त्यापासून दूर रहावे. महाराष्ट्रामध्ये विविध सर्वेक्षणांच्या आकडेवारीनुसार सुमारे ५० टक्क्यांपेक्षा अधिक नागरिकांमध्ये तंबाखू सेवनाचे व्यसन असल्याचे आढळून आले आहे.तंबाखूमधील निकोटीन खूपच घातक व मारक आहे. तंबाखू मग ती खाण्याची असो की, बिडी किंवा सिगारेटमधून ओढण्याची यात निकोटीनचे हे अंत्यत घातक,  मारक रसायन असते, जे तोंडापासून  ते लहानमोठ्या आतड्यांपर्यंतच्या कॅन्सरचे कारण बनते. तंबाखू  व तंबाखूजन्य पदार्थ खाणे किंवा  बिडी सिगारेटच्याद्वारे ओढणे  म्हणजे साक्षात मृत्यूला कवटाळणे होय. तंबाखू खाण्याची सवय सोडण्यासाठी मनाचा निर्धार पक्का करा. तंबाखू स्वत: खाऊ नका, बिडी, सिगरेट ओढू नका व इतरांनाही ओढू देऊ नका, बिडी, सिगरेट ओढणाऱ्यांच्या संपर्कात राहू नका किंवा संपर्कात येऊ नका.तबांखूसेवन व सिगरेट ओढणाऱ्यांचे फॅड दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे. आज ‘जागतिक तंबाखू सेवन विरोधी दिना’ निमित्त नागरिकांनी स्वत:च्या आरोग्यासाठी पाऊल उचलण्याची गरज आहे. आधुनिक जीवनशैलीमध्ये कामाच्या ताण-तणावामुळे धूम्रपानाचे प्रमाण वाढले आहे. विशेषत: तरुण मुला-मुलींमध्ये धूम्रपानाचे प्रमाण वाढत आहे. साधारणत: २० ते ३५ वयोगटांतील तरुणांमध्ये येणाऱ्या हृदयविकारांमध्ये ३० टक्के हृदयविकार हे तंबाखूमुळे होतात. भविष्यात मानसिक त्रास व अन्य त्रास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मनावर ताबा ठेवून तंबाखू सेवन बंद केले पाहिजे. हाच यावरील सर्वोत्तम उपाय ठरू शकतो.-डॉ. अभय सोमाणी, हृदयविकारतज्ज्ञ, पुणे