शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

पाणी हापसून आता थकलो!

By admin | Updated: May 8, 2017 02:21 IST

हातपंपाचे पाणी हापसून हापसून आता थकलो... दिवसभरात कसेबसे चार हंडे पदरात पडतात... अशा भावना व्यक्त केल्या. भोर तालुक्यातील

लोकमत न्यूज नेटवर्कभोर : हातपंपाचे पाणी हापसून हापसून आता थकलो... दिवसभरात कसेबसे चार हंडे पदरात पडतात... अशा भावना व्यक्त केल्या. भोर तालुक्यातील शिरोली गावातील महिलांनी. शिरवली हिर्डोस मावळ गावात कोणत्याच प्रकारची पाणीपुरवठा योजना नसून कुठेच पाणी उपलब्ध नाही. एका हातपंपावर नंबर लावून पाणी भरले जाते. खर्चाच्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. मात्र अद्याप टँकर सुरू झालाच नाही. पाणी हापसून महिलांना खांदेदुखी व अंगदुखीचे आजार उद्भवत आहेत.भोर तालुक्याच्या पश्चिम भागातील नीरादेवघर धरण भागात दरवर्षी साडेतीन हजार मिलिमीटर पाऊस पडतो आणि पाणी डोंगरावरून वाहून जाते. धरण भरते आणि पुन्हा रिकामे होते. धरणाच्या काठावरील शिरवली गावात १५ वर्र्षांपासून उन्हाळ््यात टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. गावात कोणत्याच प्रकारची पाणीपुरवठ्याची योजना राबवली गेली नाही. एक हातपंप आहे, मात्र मार्च महिन्यानंतर त्याला पाणी कमी पडत असल्याने पाण्यासाठी भटकंती करावी लागते. हे वर्षानुवर्षे सुरू आहे. राष्ट्रवादी काँॅग्रेसच्या वतीने रणजित शिवतरे यांनी पाणी साठवण्यास टाक्या आणि खासगी टँकरने पाणीपुरवठा सुरू केला तो टँकर अधूनमधून येत असल्याने पाण्याचा थोड्याफार प्रमाणात दिलासा मिळत आहे. पाण्यावाचून महिलांचे होताहेत हाल गावाजवळचे ढवरे आटले असून जवळपास कुठेच पाणी उपलब्ध नसल्याने तीन किलोमीटरवर असलेल्या नीरादेवघर धरणावरून डोक्यावरून किंवा पिक-अप जीपने विकत पाणी आणावे लागत असल्याने तेथील महिलांचे पाण्यावाचून प्रचंड हाल सुरू आहेत.रिंगरोडला लागून असलेल्या हातपंपाला थोड्याफार प्रमाणात पाणी येत असल्याने दिवसभर रांगा लावून तासाला चार हंडे याप्रमाणे हापसून पाणी भरावे लागत आहे. दरवर्षी उन्हाळ््यात हेच काम करावे लागत असल्याने जीव कासावीस होत असल्याचे येथील महिला सांगतात. यावर कायमस्वरुपी उपाययोजना करून पाण्याचा प्रश्न सोडविण्याची मागणी येथील ग्रामस्थ करीत आहेत.