शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

सासरच्या छळाला कंटाळून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:12 IST

पतीसह तिघांविरोधात गुन्हा : बारामती : सतत भांडणे करून मानसिक त्रास दिल्याने सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेने ...

पतीसह तिघांविरोधात गुन्हा :

बारामती : सतत भांडणे करून मानसिक त्रास दिल्याने सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेने गळफास घेत आत्महत्या केल्याचा प्रकार बारामती शहरात घडला आहे. याप्रकरणी विवाहितेच्या पती, जाऊ, सासू या तिघांविरोधात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार : याबाबत मयत सई हिची आई वंदना संजय बोंद्रे (रा. लक्ष्मीनगर, फलटण) यांनी फिर्याद दिली आहे. सई उन्मेघ गायकवाड (वय २६ ) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. शहरातील रुई भागात बुधवारी (दि. २४ ) घडला. पती उन्मेघ किशोर गायकवाड, सासू शोभा किशोर गायकवाड व जाऊ तनुजा तृणाल गायकवाड (रा. दुर्वांकुर अपार्टमेंट) अशी गुन्हा दाखल झालेल्या तिघांची नावे आहेत. उन्मेघ व सई यांचा विवाह २०१४ रोजी झाला होता. सई सासरी नांदत असताना पतीकडून तिला सतत भांडणे काढून मानसिक त्रास दिला जात होता. तसेच वारंवार मारहाण केली जात होती. दीड वर्षांपूर्वी त्यांच्यात वाद झाला होता. तेव्हा बारामती व फलटणमधील तक्रार निवारण केंद्रात सईने तक्रारी अर्ज दाखल केला होता. त्यानुसार दोन्ही बाजूंना समजावून सांगण्यात आल्यावर ती पुन्हा नांदण्यास आली होती. दरम्यान, पतीने तिला दारु पिऊन मारहाण, चारित्र्यावर संशय घेणे सुरूच ठेवले.

हे दोघे रुई येथे भाडोत्री घरामध्ये राहू लागले. तरीही पतीकडून होणारा त्रास सुरूच राहिला. माहेरी फोन करू न देणे, फोन वापरू न देणे असे प्रकार केले जावू लागले. सईने ही बाब आपल्या आईला वेळोवेळी कळवली. बुधवारी (दि. २४) रोजी उन्मेघ याने फिर्यादीला फोन करत तुमच्या मुलीला नांदवायचे नाही, तिला तुम्ही घेऊन जा, मी माझा मुलगा देणार नाही, अशी धमकी दिली. त्यानंतर सई हिने आईला मला आता जगण्याचा कंटाळा आला आहे, माझे सगळे संपले असे म्हणून फोन कट केला. दुपारी दोनच्या सुमारास उन्मेघ याने फिर्यादी फोन करून सांगितले की, तुमची मुलगी दरवाजा उघडत नाही. मी मुलाला घेऊन दुर्वांकूर सोसायटीत चाललो आहे. त्यानंतर फिर्यादीने मुलीशी संपर्क साधला. परंतु तिने फोन घेतला नाही. दुपारी अडीचच्या सुमारास उन्मेघ याने सई हिने गळफास घेतल्याचे फिर्यादीला कळवले. त्यानंतर माहेरकडील मंडळींनी बारामतीत रुई रुग्णालयात धाव घेतल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.