शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

‘बडी कॉप’च्या वापराने टिंगलखोर गजाआड

By admin | Updated: April 23, 2017 04:23 IST

आयटी कंपन्यांमधील महिलांसाठी पुणे पोलिसांनी निर्माण केलेल्या ’बडी कॉप ’ संकल्पनेचा वापर करुन चंदननगर येथील एका कॉलसेंटरमधील मुलीने एका टिंगलखोराची तक्रार केली.

पुणे : आयटी कंपन्यांमधील महिलांसाठी पुणे पोलिसांनी निर्माण केलेल्या ’बडी कॉप ’ संकल्पनेचा वापर करुन चंदननगर येथील एका कॉलसेंटरमधील मुलीने एका टिंगलखोराची तक्रार केली. त्याला पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेऊन अटक केली. किशोर रामदास औटी (वय ३०,विशालदिप सोसायटी, हनुमान मंदिराजवळ, चंदननगर)असे आरोपीचे नाव आहे. २१ तारखेला हा प्रकार घडला. चंदननगर बडीकॉप व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर पोलीस मदत हवी असल्याबद्दल कॉलसेंटरमधील मुलीने मेसेज केला. फौजदार संदिप साळुंके व कर्मचा-यांनी त्या मुलीस फोन केला. विचारपूस करुन मदतीसाठी धाव घेतली. त्यावेळी औटी हावभाव, खाणाखुणा करुन तू खूप छान दिसतेस असे म्हणत असल्याचे सांगितले.औटी ही मुलगी काम करत असलेल्या कॉल सेंटरमध्येच सेवेस आहे. या मुलीने त्याच्या आक्षेपार्ह वर्तनाविषयी तक्रार केली होती, कंपनी प्रशासनाने त्याला सक्त ताकीद दिली होती. बडीकॉपच्या वापरामुळे औटी अखेर गजाआड गेला.त्याच्यावर कलम ५०९ नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. रश्मी शुक्ला,सायबय गुन्हे शाखेचे उपायुक्त दिपक साकोरे,तांत्रिक पथकाचे पंकज घोडे, प्रणित कुमार आदींनी आयटी कंपन्यांमधील महिलांना मार्गदर्शन केले होते.- पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी महिलांच्या सुरक्षिततेसाठी बडीकॉप संकल्पना सुरु केली आहे. सध्या हडपसर, चंदननगर, हिंजवडी आणि येरवडा या आयटी कंपन्या आणि कॉलसेंटर मोठ्या संख्येने असलेल्या भागात पोलीस अधिकारी आणि या कंपन्यांमधील महिला यांचे व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप बनविण्यात आले आहेत. एका ग्रुपमध्ये ५० महिला कर्मचारी,वरिष्ठ पोलीस निरिक्षक,फौजदार आणि एक कर्मचारी यांचा समावेश आहे.