शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

धरणातला गाळ ठरतोय पाण्यासाठी काळ

By admin | Updated: February 3, 2016 01:41 IST

कित्येक दशकांपासून पुणे जिल्ह्यातील धरणांमधील गाळ काढलेला नसल्याने धरणांच्या साठवण क्षमतेत मोठी घट झाली आहे

पुणे : कित्येक दशकांपासून पुणे जिल्ह्यातील धरणांमधील गाळ काढलेला नसल्याने धरणांच्या साठवण क्षमतेत मोठी घट झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात पाणीटंचाईने अनेक गावे तहानलेली असताना धरणांतील गाळच पाण्यासाठी काळ ठरत असल्याचे वास्तव समोर येत आहे. जलसंधारणासाठी एकीकडे राज्यशासनातर्फे जलयुक्त शिवारसारख्या योजना राबविल्या जात आहेत. मात्र, पाण्याचे मुख्य स्रोत असलेल्या जिल्ह्यातील धरणातील गाळ गेल्या कित्येक दशकांपासून काढला गेलेला नाही. पुणे जिल्ह्यात जवळपास २५ धरणे आहेत. या धरणांमुळे मोठे क्षेत्र सिंचनाखाली आलेले आहे. जिल्ह्यातील कुकडी प्रकल्पातील धरणे अहमदनगर जिल्ह्यासाठी, तर उजनी धरणामुळे सोलापूर जिल्ह्याचा पाणीप्रश्न मार्गी लागला आहे. मात्र, गेल्या काही दशकांत या धरणात गाळ साचल्याने साठवणक्षमतेवर परिणाम झाला आहे. राज्य शासन एकीकडे जलसंधारणासाठी अनेक मोहिमा तसेच योजना राबवीत आहेत. सध्या जलयुक्त शिवार योजना मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात राबविली गेली आहे. यामुळे भूजलपातळीत वाढ झाली आहे. मात्र पाण्याचे मुख्य स्रोत असलेल्या धरणातील गाळ काढण्यासाठी कुठलीही यंत्रणा नसल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत आढळलेले आहे. भोर तालुक्यातील भाटघर धरणाची पाणी साठवण्याची क्षमता २३ टीमसी आहे. या धरणात जवळपास १० ते १२ टक्के गाळ साठल्याने दोन टीमसी पाणी धरणात कमी साठत असल्याची माहिती पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिली. नीरा देवघर धरणाची साठवण क्षमता गाळामुळे जवळपास दोन ते चार टक्क्यांनी घटली आहे. शिरूर तालुक्यातील घोड धरणाचीही हीच अवस्था आहे. पुरंदर तालुक्यातील वीर धरणात जवळपास १ टीएमसी गाळ साठला आहे. हा गाळ काढला गेल्यास पुरंदर तालुक्याच्या दुष्काळी भागाला पाणीपुरवठा करणे शक्य होणार आहे. उजनी धरणात ३४ वर्षांपासून १४.९६ टीएमसी गाळ साठला आहे. शेतकऱ्यांच्या विरोधामुळे २०११-१२च्या सुमारास उजनीतील गाळ काढण्याच्या प्रक्रियेस मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. ‘मेरी’ या नाशिक येथील संस्थेने सन २००२ मधे धरणातील गाळाचा अभ्यास केला. त्या काळात त्या संस्थेच्या अहवालानुसार धरणात ८.५८ टीएमसी गाळ साठल्याचे निदर्शनास आले होते. नोव्हेंबर २०११ मध्ये नवी दिल्ली येथील केंद्रीय जल आयोगाने ‘टुजो विकास’ या संस्थेच्या माध्यमातून, जीपीएस पद्धतीने गाळाचे फेरसर्वेक्षण केले. त्याचा अंतिम अहवाल मार्च २०१२ ला शासनास सादर केला, त्या वेळी धरणात १४.९६ गाळ साठल्याची माहिती पुढे आली. असा मोजतात गाळयाबाबत पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, गाळ घनमीटर पद्धतीमध्ये मोजला जातो. धरणातील गाळाचे सर्वेक्षण करण्यासाठी होडीच्या साहाय्याने एका विशिष्ट मापकाचा वापर करून ते पाण्यात सोडले जाते. त्यानुसार गाळाची मोजणी केली जाते. त्यामुळे पाणीसाठ्याची क्षमता कमी झाली आहे. याशिवाय पाणीसाठा कमी झाला, तर गाळ लांबी-रुंदीमध्ये देखील मोजला जातो. धरण बांधल्यानंतर ५० ते १०० वर्षांच्या कालावधीनंतर धरणांमधील गाळ काढता येतो. तोपर्यंत गाळ काढता येत नाही. आणखी बातम्या पान ८