शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

नियोनजामुळे वेळेत झाली मतमोजणी

By admin | Updated: February 24, 2017 03:20 IST

एकाच प्रभागात मिळून सर्व गटांचे तब्बल ५१ उमेदवार, उर्वरित दोन प्रभाग निवडणुकीपासूनच

पुणे : एकाच प्रभागात मिळून सर्व गटांचे तब्बल ५१ उमेदवार, उर्वरित दोन प्रभाग निवडणुकीपासूनच संवेदनशील झालेले. मतमोजणी केंद्रांच्या भोवती प्रचंड गर्दी तरीही वेळेचे व्यवस्थित नियोजन केल्यामुळे भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाची मतमोजणी वेळेत झाली. प्रभाग क्रमांक १८ १९ व २० अशा तीन प्रभागांची मतमोजणी बंडगार्डन जवळच्या मौलाना अबूल कलाम सभागृहात ठेवण्यात आली होती. निवडणूक निर्णय अधिकारी संजय पाटील यांनी बुधवारी रात्रीपासूनच मतमोजणीचे सर्व नियोजन करून ठेवले होते. प्रभाग क्रमांक १८ मध्ये चारही गटांचे मिळून ५१ उमेदवार होते. त्यामुळे या प्रभागाची मतमोजणी सर्वात शेवटी घेण्याचा निर्णय पाटील यांनी घेतला. त्यामुळे सकाळच्या सत्रातच प्रभाग क्रमांक २० व १९ या दोन्ही प्रभागांची मोजणी पूर्ण झाली. त्यानंतर प्रभाग क्रमांक १८ च्या मतमोजणी सुरू झाली. तोपर्यत कर्मचारी सरावले गेल्याने हा प्रभागही वेगात पूर्ण झाला. सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सुचित्रा पाटील तसेच क्षेत्रीय कार्यालयाच्या सहायक आयुक्त संध्या गागरे यांनी पाटील यांना सहकार्य केले. १४ टेबल्सवर ४५ कर्मचाऱ्यांनी मतमोजणीचे काम केले. लोहियानगर, कासेवाडी, खडकमाळ आळी, मोमीन पुरा, महात्मा फुले पेठ, ताडीवाला रस्ता, ससून रुग्णालय असा परिसर या तिन्ही प्रभागात येतो. संवेदनशील म्हणून हा परिसर प्रसिद्ध आहे. अनेक आजीमाजी नगरसेवक रिंगणात असल्यामुुळेही या विभागाची चर्चा होती. त्यातच उमेदवारी अर्ज दाखल करताना राजकीय वाद निर्माण झाले होते. त्यामुळे पाटील यांनी ज्या प्रभागाची मोजणी आहे, त्याच उमेदवार व त्यांच्या मतमोजणी प्रतिनिर्धींना सभागृहात सोडण्याचे आदेश पोलिसांना दिले होते. त्या प्रभागाची मतमोजणी पूर्ण झाल्यानंतरच पुढच्या प्रभागासाठी आलेल्या उमेदवार व प्रतिनिधींना आत सोडले जात होते. (प्रतिनिधी)ा्रभाग क्रमांक १८ च्या मतमोजणी दरम्यान काही उमेदवारांच्या प्रतिनिधींनी यंत्रात असलेले मतदान व प्रत्यक्ष झालेले मतदान यात तफावत असल्याने मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आणले. त्यावरून वाद निर्माण झाला, मात्र पाटील यांनी यंत्रात असलेली मतदान संख्याच गृहित धरण्यात येईल, लिहिताना कर्मचाऱ्यांकडून काही चूक झाली असेल तर दुरूस्त करण्यात येईल असे सांगितल्यानंतर तणाव निवळला. सायंकाळी ७ वाजता सर्व प्रभागांची मतमोजणी कोणताही गोंधळ न होता पूर्ण झाली व सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला.