शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

नीरेतील बुवासाहेब मंदिराशेजारील भाजी मंडईत वेळेचे बंधन पायदळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:10 IST

-- नीरा : नीरा (ता.पुरंदर) येथील बुवासाहेब मंदिराशेजारील भाजी मंडईतील भाजीविक्रेते पोलिसांची डोकेदुखी ठरत आहेत. ग्रामपंचायतीनी वेळेचे बंधन घालून ...

--

नीरा : नीरा (ता.पुरंदर) येथील बुवासाहेब मंदिराशेजारील भाजी मंडईतील भाजीविक्रेते पोलिसांची डोकेदुखी ठरत आहेत. ग्रामपंचायतीनी वेळेचे बंधन घालून ही कोरोना संसर्गाचे व वेळेची बंधने पायदळी तुडवली जात आहेत. त्यामुळे काल सोमवारी या भाजी मंडईत नीरा पोलिसांनी दंडात्मक कारवाई केल्यानंतर ही आज मंगळवारी पुन्हा वेळेची मर्यादा न पाळता हे मगरुर भाजी विक्रेते सायंकाळी पाच वाजेपर्यंत दुकाने थाटून बसली होते.

नीरा ग्रामपंचायतीने मागील आठवड्यापासून अत्यावश्यक दुकाने सकाळी दहा ते चार यावेळेत सुरु ठेवण्याचे सुचवले होते. नीरा बाजार तळावरील भाजी विक्रेती, शेतीपूरक दुकाने, किराणा व्यावसायिक, मटण, मच्छीविक्रेती वेळेची बंधने पाळतात, मात्र बारामती रोडवरील बुवासाहेब मंदिरा शेजारील भाजी मंडईतील भाजी विक्रेते दुपारीचार नंतरही दुकाने थाटून बसल्याचे दिसल्याने प्रवाशी भाजी खरेदी करण्यासाठी गर्दी करत आहेत.

काल सोमवारी नीरा पोलीस दूरक्षेत्राचे सहायक पोलीस उपनिरीक्षक कैलास गोतपागर, संदीप मोकाशी, पोलीस पाटील राजेंद्र भास्कर यांनी दुपारी चारनंतर या मंडईत धडक कारवाई करत कोरोनाचे नियम न पाळणाऱ्या व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई केली. ६ भाजी विक्रेत्यांकडून प्रत्येकी ५०० रुपयांप्रमाणे ३ हजारांचा दंड वसूल केला होता. तरीही मंगळवारी पुन्हा या भाजी विक्रेत्यांनी वेळेचे बंधन न पाळता दुपारी चार नंतरही भाजी मंडई सुरू ठेवली होती.

चौकट

नीरा आठवडे बाजार हा बुधवारी असतो. ब्रेक द चेन अंतर्गत जिल्ह्यातील सर्व आठवडे बाजर बंद असले, तरी नीरा येथील बुवासाहेब मंदाराशेजारी भाजी मंडई नियमीत भरवली जात आहे. मागील दोन्ही आठवड्यांत या ठिकाणी बुधवारी मोठ्या प्रमाणावर भाजी विक्रेते, सुकट, बोंबीलवाले, फळ विक्रेते, बेकरी उत्पादने विक्रेत गर्दी करत आहेत. आज बुधवरी तरी याठिकाणी भाजी मंडई भरते का, हे पाहणे गरजेचे आहे.

फोटो क्रमांक : २० नीरा भाजीमंडई सुरू

फोटोओळ : नीरा (ता. पुरंदर) येथील बुवासाहेब भाजी मंडईत वेळेचे बंधन पायदळी तुडवत भाजी विक्रेत सायंकाळी पाच वाजेपर्यंत दुकाने थाटून बसली होती.