शहरं
Join us  
Trending Stories
1
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
2
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
3
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर
4
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! १ ऑक्टोबरपासून 'हे' महत्त्वाचे फीचर कायमस्वरूपी बंद होणार
5
हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?...
6
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
7
विद्यार्थ्याच्या हत्येवरून अहमदाबाद तापले, रस्त्यावर उतरले हजारो लोक, पोलीस आणि NSUI मध्ये वादावादी
8
छत गळतेय, उंदीर फिरतात आणि वीज नसते; इमरान खान यांच्या पत्नी बुशरा बीबींची तुरुंगात दयनीय अवस्था
9
Viral Video: लोणावळ्यात मद्यधुंद महिलांमध्ये फ्री-स्टाईलमध्ये हाणामारी; पोलीस आल्यानंतरही थांबल्या नाहीत!
10
Ajinkya Rahane : हीच ती वेळ! सोशल मीडियावरुन पोस्ट शेअर करत अजिंक्य रहाणेनं खांद्यावरील ओझे केले हलके; म्हणाला...
11
इस्रायल-हमास युद्धावरून मायक्रोसॉफ्टच्या मुख्यालयात जोरदार राडा; कंपनीवर गंभीर आरोप
12
आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? या चर्चेत BCCI नं पुडी सोडली, की खरंच तो कॅप्टन होणार?
13
"राष्ट्रीय पुरस्कार उचलण्यासाठी माझा एकच हात...", शाहरुख खानचा अफलातून सेन्स ऑफ ह्युमर
14
बेस्ट निवडणूक २०२५: पहिल्यांदाच युती अन् ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; ‘ही’ आहेत ५ मोठी कारणे
15
शाळेच्या गेटजवळ स्फोटके आढळली; १० वर्षाच्या विद्यार्थ्याने उचलून फेकलं आणि...
16
'हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मूर्खपणाचं पाऊल..,' ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ म्हणाले, "ट्रम्प टॅरिफनेच ब्रिक्सला विजय मिळवून दिला.."
17
"आम्हाला त्रास झालाय का? आम्हाला माहीत आहे, काय आहे ते?"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय राऊत स्पष्टच बोलले
18
पाकिस्तान अनेक हवाई मार्ग करत आहे बंद! नेमकं कारण तरी काय?मोठे नियोजन सुरू असल्याची शक्यता
19
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
20
बांगलादेशला पुन्हा पूर्व पाकिस्तान करण्याचा मुनीरचा डाव, ट्रम्प यांना दाखवली अशी लालूच, भारतासाठी धोका वाढला

यंदा मोठय़ा सभांची वानवा..

By admin | Updated: October 13, 2014 23:25 IST

पुणो शहर हे देशातील महत्त्वाचे राजकीय केंद्र म्हटले जात अस़े त्यामुळे निवडणुकांमध्ये पुण्यात सभा घेण्याला राष्ट्रीय स्तरावरील नेते नेहमीच महत्त्व देत आले आहेत़

पुणो : पुणो शहर हे देशातील महत्त्वाचे राजकीय केंद्र म्हटले जात अस़े त्यामुळे निवडणुकांमध्ये पुण्यात सभा घेण्याला राष्ट्रीय स्तरावरील नेते नेहमीच महत्त्व देत आले आहेत़ यंदा मात्र, राष्ट्रीय स्तरावरील सर्वच नेत्यांनी पुण्याला अपवाद केले. त्याऐवजी जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये सभा घेण्यावर भर दिला. 
एकाच टप्प्यात संपूर्ण राज्यात मतदान घेण्याचा निवडणूक आयोगाने घेतलेल्या निर्णयामुळे यंदा पुणो शहर मोठय़ा सभांनी गाजले नाही़
राजकीय क्षेत्रत राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांच्या सभा पुण्यात झाल्यानंतर तिचा परिणाम केवळ पुण्यातच नाही तर आजूबाजूच्या परिसरातील अनेक मतदारसंघांवर होत असल्याने पुण्यातील सभेला नेहमीच महत्त्व येत अस़े  इंदिरा गांधी, अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, विश्वनाथप्रताप सिंह, राजीव गांधी, यशंवतराव चव्हाण हे निवडणुकांच्या प्रचारात नेहमीच  पुण्यात सभा घेत असत़ लोकसभा निवडणुकीतही नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांनी पुणो शहरात सभा घेण्याचा प्राधान्य दिले होत़े 
विधानसभा निवडणुकीत मात्र, पुणो शहरात एकाही राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांच्या सभा झाल्या नाहीत़ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुणो शहरात सभा घेण्याऐवजी बारामती आणि पिंपरी येथे सभा घेण्यास महत्त्व दिल़े काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीही पुरंदरमध्ये सभा घेतली़ 
राज्यपातळीवरील नेत्यांमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुणो शहरातील 8 उमेदवारांसाठी सभा घेतली़ त्यानंतर दुस:या दिवशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची नदीपात्रत सभा झाली़ त्यामुळे काही प्रमाणात वातावरण ढवळून निघाल़े याशिवाय काँग्रेसचे प्रचारप्रमुख नारायण राणो यांच्या दोन सभा, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते विनोद तावडे यांच्या शहरातील काही मतदारसंघात सभा झाल्या़ 
अन्य राज्यातून आलेल्या नेत्यांनी मोठय़ा सभा घेण्याऐवजी प्रचारफेरी, मेळावे घेण्यावरच भर दिला होता़ मोठय़ा 
नेत्यांच्या सभांमुळे पूर्ण शहरातील 
वातावरण जे ढवळून निघत असे, 
असे वातावरण यंदा तयार होताना आढळून आले नाही़ (प्रतिनिधी)
 
सभा घेणो होऊ लागले खर्चिक
मोठय़ा नेत्यांच्या सभा घेण्यासाठी उमेदवारांना मोठी शक्ती खर्च करावी लागत़े या सभांची तयारी करण्यात त्यांचे प्रचाराचे किमान 2 दिवस वाया जातात़ याशिवाय सभेदरम्यान पाऊस व अन्य काही बाबी विपरित घडल्या तर त्याचा उलटा परिणाम होण्याची शक्यताही असत़े सभेची परवानगी, सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांचा बंदोबस्त, सभामंडप उभारणो व खुच्र्याची व्यवस्था करणो, मैदान मिळविण्यासाठी धडपड करणो, त्यानंतर प्रत्यक्ष सभेला कार्यकत्र्याची गर्दी जमविणो अशी सर्व तारेवरची कसरत करावी लागत़े त्यात पुणो शहरात ग्रामीण भागाप्रमाणो दिवसा सभा घेण्याचा रिवाज नाही़ त्यामुळे सायंकाळीच सभा घ्यावी लागत़े इतके सर्व करुनही ऐनवेळी सभेला गर्दी कमी झाली आणि तसे चित्र मीडिया, वृत्तवाहिन्यांवरुन प्रसिद्ध झाले तर त्याचा विपरित परिणाम होण्याचा धोका असतो़ त्यामुळे मोठय़ा सभांऐवजी थेट मतदारांर्पयत पोहचण्यासाठी जास्तीतजास्त वेळ देणो उमेदवारांना अधिक आवश्यक वाटल़े त्यामुळे शहरात मोठय़ा नेत्यांच्या सभा घेण्यास उमेदवारांनी जास्त रस दाखविला नाही़