शहरं
Join us  
Trending Stories
1
'महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतोय, तुम्हाला आपटून आपटून मारू?', भाजप खासदार निशिकांत दुबेंचा ठाकरेंवर हल्ला
2
"पैसे देणे होत नसेल, तर पत्नी माझ्या घरी आणून सोड"; व्याजाच्या पैशावरून त्रासाने संपवलं जीवन
3
ऐकावं ते नवलंच... अचानक लोकप्रिय ब्रँडच्या बिअर दुकानांमधून झाल्या गायब, राजधानीत नक्की काय झालं?
4
"हो मी पाकिस्तानी सैन्याचा एजंट होतो", तहव्वूर राणाने चौकशीमध्ये केले अनेक धक्कादायक गौप्यस्फोट
5
Crizac IPO Allotment Status: ६० पट सबस्क्रिप्शन, शेअर्स अलॉट झालेत का, कसं कराल चेक? GMP प्रीमिअमवर
6
फुलेरात पुन्हा येण्याची तयारी सुरु करा! 'पंचायत ५'ची अधिकृत घोषणा, 'या' दिवशी रिलीज होणार
7
खळबळजनक! दिवसाढवळ्या एका व्यावसायिकाची गोळ्या घालून हत्या
8
ट्रम्प यांनी मस्क यांना झटका देण्यास केली सुरुवात; अमेरिकन सैन्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवली 'गोळी'
9
किती वाईट दिसतंय ते? अंकिता लोखंडेचा लूक पाहून चाहते शॉक; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
10
हाफिज सईद पाकिस्तानात नाही? नेमका कुठे लपून बसलाय तोयबाचा म्होरक्या? 'या' व्यक्तव्यांमधून मिळाले मोठे संकेत
11
हृदयद्रावक! ११ महिन्यांच्या मुलीने गमावले आई-वडील, आजी; झाली अनाथ, डोळे पाणावणारा Video
12
चातुर्मासातील पहिले भौम प्रदोष व्रत: ‘असे’ करा पूजन, महादेवांची अखंड कृपा; शुभच होईल!
13
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचा ग्रॅज्युएट; तरीही करतोय फूड डिलिव्हरीचं काम, महिन्याला लाखोंची कमाई
14
५ जुलैला जपानवर कोणतेही संकट आलेच नाही? रिओ तात्सुकीची भविष्यवाणी फोल ठरली?
15
Chaturmas 2025 Rangoli: चातुर्मासात दारासमोर रोज दोन बोटं रांगोळी काढा आणि लक्ष्मीकृपा मिळवा!
16
सुपरहिट सिनेमांचा साक्षीदार 'फिल्मीस्तान स्टुडिओ' अखेर विकला; फिल्म इंडस्ट्री भावुक
17
गुरुवारी गुरुपौर्णिमा: ५ मूलांक लकी, विविध लाभच लाभ; यश-प्रगती-भरभराट, स्वामी कल्याण करतील!
18
भयंकर! दरोडेखोरांनी घरात घुसून पत्नी, मुलांसमोर केली इंजिनिअरची हत्या; पैसे, दागिने घेऊन पसार
19
अमेरिका-चीन व्यापार युद्धात अंबानींची एन्ट्री? बीजिंगला जाणारे गॅस जहाज आता थेट भारतात!
20
कर्नाटकातील अथणीत कार-बसचा अपघात, चौघे ठार; कोल्हापूरहून देवदर्शन करून परतताना काळाचा घाला

तीळगुळाने स्नेहभाव दृढ

By admin | Updated: January 16, 2015 02:42 IST

शहर आणि परिसरात गुरुवारी पारंपरिक पद्धतीने, उत्साहात महिलांनी मकरसंक्रात साजरी केली. शहरातील विविध मंदिरात सुगडी पूजनासाठी महिलांनी गर्दी केली होती

पिंपरी : शहर आणि परिसरात गुरुवारी पारंपरिक पद्धतीने, उत्साहात महिलांनी मकरसंक्रात साजरी केली. शहरातील विविध मंदिरात सुगडी पूजनासाठी महिलांनी गर्दी केली होती. हळदी-कुंकवाने सणाला प्रारंभ करण्यात आला. ‘तिळगूळ घ्या गोड गोड बोला’ म्हणत तिळगुळाचे वाटप करण्यात आले.यंदा मकरसंक्रात एक दिवस उशिरा साजरी करण्यात आली. पण सणातील पारंपरिक उत्साह कायम होता. महिलांनी शहरातील मोरया गोसावी समाधी मंदिर, शितळादेवी मंदिर, खंडोबा मंदिर, तुळजाभवानी मंदिर, गणेश मंदिर, दुर्गा माता मंदिरात पूजेसाठी गर्दी केली होती. महिलांनी घरासमोर व मंदिरासमोर रांगोळी काढली. पाच सुगडीत गव्हाचे ओंबे, ज्वारींची कणस, तिळगूळ, गाजर, ऊस, हरभरा टाकून फुलांनी सूप सजवले होते. हे सूप घेऊन महिलांनी मंदिरात सुगडी-सुपाचे पूजन केले. मंदिरात मूर्तीसमोरमोठ्या आनंदात एकमेकींना हळदी-कुंकू लावले. सुगडी, वाण एकमेकींना देऊन संक्रातीच्या शुभेच्छा देण्यात आल्या. महिलांनी मंदिरांत उपस्थित ज्येष्ठ महिलांचे आशीर्वाद घेतले. मंदिरातील तुळशीसमोर व मूर्तीसमोर एक एक सुगडी ठेवून पूजन केले. यातच काही महिलांनी मंदिरात उखाणे घेऊन पारंपरिकता जपली. घराघरांतही आनंदात कुटुंबीयांसमवेत सक्रांत साजरी केली. तिळगूळ, तिळाचे लाडू, तिळाची चिक्की अशा विविध पाककृतींनी मित्रपरिवार, कुटुंबीयांत मकरसंक्रात साजरी केली. संक्रातीचे खास आकर्षण असणारे पतंग उडवण्याचा आनंद अनेकांनी घेतला. वल्लभनगर आगारात तिळगूळ वाटपनेहरूनगर : वल्लभनगर एसटी आगारामध्ये प्रवाशांना तिळगूळ वाटून मकरसंक्रांत सण मोठ्या उत्साहात साजरा केला. प्रवाशांशी नाते अधिक गोड व्हावे म्हणून मकरसंक्रांत सणाच्या निमित्ताने आगारामध्ये सकाळी प्रत्येक प्रवाशाला तिळगूळ देऊन तिळगूळ घ्या गोड गोड बोला... मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या.या वेळी आगारप्रमुख आर. डी. शेलोत, स्थानकप्रमुख रोहिणी जाधव, वाहतूक नियंत्रक आर. वाय. शेख, आय. पी. तांबोळी, आर. टी. जाधव, आर. के. गेंजगे, के. एस. कांबळे, ए. एम. शिंदे आदी कर्मचारी उपस्थित होते.भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या (भोसरी विभाग) वतीने भोसरी, निगडी परिसरातील पोलीस चौकीत जाऊन पोलीस कर्मचाऱ्यांना भारतीय जनता पक्षाच्या महिला सरचिटणीस आशा काळे, निगडी मंडल अध्यक्षा सारिका पवार, भोसरी मंडल अध्यक्षा सरिता शर्मा, गीता महेंद्रू, वैशाली मोरे आदी उपस्थित होत्या.सुगडदान करण्यास महिलांची गर्दीकिवळे : विकासनगर , किवळे, रावेत , मामुर्डी , साईनगर ,गहुंजे व सांगवडे परिसरात मकर संक्रांतीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला . शहरी व ग्रामीण भागात सुवासिनी स्त्रियांनी घराजवळ असणार्या देव -देवतांच्या मंदिरांत सुगडदान करण्यासाठी गर्दी केली होती. परिसरातील बहुतांशी सुवासिनी स्त्रिया श्रीक्षेत्र देहू , आळंदी , शिरगाव व घोरवडेश्वर डोंगरावरील मंदिरात सुगडदान करण्यासाठी गेल्या होत्या . ज्या कुटुंबात मुलीचे लग्न झाल्यावर पहिले वर्ष आहे, त्यांच्या सासरहून त्या मुलीला साडी व ह्यववसा ह्य आल्याचे दिसत होते. ( ववसा म्हणजे ऊस , गाजर ,हरबरा , बोरे ,गव्हाच्या ओंब्या , व तिळगुळ आदी.) भावकीतील व आळीतील सुवासिनी स्त्रियांना ववसा पाहण्यासाठी बोलावण्याची स्त्रियांची लगबग जाणवत होती. तसेच ज्या कुटुंबातील मुलाचे लग्न झाल्यावर पहिले वर्ष आहे, त्यांच्या घरी सबंधित मुलीकडे साडी व ववसा पाठविण्याची लगबग दिसत होती. मकर संक्रांत हा स्नेह वाढविणारा सण असल्याने व परंपरेने सुवासिनी स्त्रियांनी हळदी कुंकू , तिळगुळ व नित्योपयोगी वस्तू एकमेकींना भेट म्हणून दिल्या . लहान मुले व पुरुष मंडळींही आपल्या मित्र -मैत्रिणींना तिळगुळ देत तिळगुळ घ्या, गोड बोला असे आवर्जून सांगत होते. मकर संक्रांतीला तिळाचे महत्व विशेष असून तिळाच्या अंगी जशी स्निग्धता आहे, तशी स्निग्धता स्नेह रूपाने आपल्या मित्र मंडळींमध्ये निर्माण व्हावी अशी यामागे प्रत्येकाची भावना असते . (वार्ताहर)