शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

कष्टकऱ्यांचे ‘हालसत्र’थांबेना...

By admin | Updated: November 11, 2016 01:53 IST

बँका सुरू झाल्या तशी चाकरमान्यांनी व सामान्यांनी बँकेकडे धाव घेतली आणि दिलासा मिळविला; पण ज्यांचे बँकेत खातेच नाही अशा गरिबांचे काय..?

पुणे : बँका सुरू झाल्या तशी चाकरमान्यांनी व सामान्यांनी बँकेकडे धाव घेतली आणि दिलासा मिळविला; पण ज्यांचे बँकेत खातेच नाही अशा गरिबांचे काय..? धुणीभांडी करणाऱ्या महिला, सफाई कर्मचारी, कष्टकरी महिला अशा अनेकांचे हाल आजही सुरूच राहिले. चलनातून ५०० व १०००च्या नोटा बंद झाल्या, या निर्णयाची फारशी माहिती नसल्याने व बँकेत अनेकांची खाती नसल्याने कष्टकऱ्यांना आजही अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.अनेक घरांत जाऊन मोलकरीण म्हणून काम करणाऱ्या महिलांचे उत्पन्न कमी असल्याने त्यांचे बँक खाते नाही. पगारही रोखीने मिळतो. अशा परिस्थितीत त्यांच्यापुढे प्रश्न निर्माण झाले. त्यांचे अनेकदा बँक खाते नसते, तसेच घरकाम करणाऱ्या मोलकरणींना पगारही रोखच दिला जातो. त्यामुळे अनेक महिलांची व कष्टकरी वर्गाची दैनंदिन व्यवहार करताना मोठी अडचण झाली. बँकेत पैसे बदलून मिळतील इतकेच ठाऊक असणाऱ्या कष्टकऱ्यांनी पैसे बदलून मिळतील म्हणून धाव घेतली खरी; परंतु नोटा बदलून घेण्यासाठी ओळखपत्राची आवश्यकता असल्याचे अनेकांना माहीत नसल्याने रिकाम्या हाताने परतावे लागले. घरकाम करणाऱ्या महिलांनी पाचशे-हजाराच्या नोटा बदलून देण्याची विनंती आपल्या मालकांकडे केली. त्यांचेही हात बांधलेले असल्याने काहींनी घरखर्चासाठी कामाच्या ठिकाणाहून काही रक्कम उसनी घेतली. बँकेच्या व्यवहाराची पुरेशी माहिती नसणाऱ्या घरकाम करणाऱ्या महिलांमध्ये या निर्णयाने संभ्रमाचे वातावरण होते. या महिला आपण काम करीत असलेल्या ठिकाणी मालकिणीलाच ‘बाई या नोटा सुट्या करून द्याल का हो?’ अशी विनंती करीत होत्या. बँक व्यवहाराबाबत पुरेसे ज्ञान नसणाऱ्यांची अशा प्रकारे अडचण झाल्याचे चित्र होते.(प्रतिनिधी)